मीरा भाईंदरमध्ये इमारतीच्या गॅलरीसहीत वृद्ध महिला खाली कोसळली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2018 03:47 PM2018-06-15T15:47:46+5:302018-06-15T15:47:46+5:30

भाईंदरमधील सुमारे 38 वर्ष जुनी असलेली मेंडीस हाऊस या इमारतीच्या दुसऱ्या मजल्याच्या सदनिकेची गॅलरी कपडे वाळत घालणाऱ्या वृद्ध महिलेसह कोसळल्याची घटना शुक्रवारी (15 जून ) सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली.

The elderly woman collapsed in Meera Bhayander with the gallery of the building | मीरा भाईंदरमध्ये इमारतीच्या गॅलरीसहीत वृद्ध महिला खाली कोसळली

मीरा भाईंदरमध्ये इमारतीच्या गॅलरीसहीत वृद्ध महिला खाली कोसळली

googlenewsNext

मीरारोड - भाईंदरमधील सुमारे 38 वर्ष जुनी असलेली मेंडीस हाऊस या इमारतीच्या दुसऱ्या मजल्याच्या सदनिकेची गॅलरी कपडे वाळत घालणाऱ्या वृद्ध महिलेसह कोसळल्याची घटना शुक्रवारी (15 जून ) सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली. जखमी महिलेला रुग्णालयात दाखल केले गेले आहे. ही इमारत पालिकेच्या धोकादायक यादीत नव्हती. पावसाळा सुरू झाल्यानंतरची ही पहिली दुर्घटना आहे .
भाईंदर पश्चिमेस क्रॉस गार्डनच्या लेपोरा स्ट्रीटवर मेंडीस हाऊस ही तीन मजली इमारत आहे. प्रत्येक मजल्यावर दोन या प्रमाणे एकूण ६ सदनिका व तळाला तीन दुकाने आहेत. दुसऱ्या मजल्यावरील २०१ क्रमांकाच्या सदनिकेत राहणाऱ्या मेरी जोजफ ( ७० ) या सकाळी १० वाजण्याच्या सुमारास गॅलरीत कपडे वाळत घालत होत्या. त्याचवेळी अचानक बाल्कनीचा कठडा खाली कोसळला. परिसरातील रहिवाशांनी मेरी यांना त्वरित पालिकेच्या जोशी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. 

दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत दुसऱ्या मजल्यावर अडकलेल्या तसेच अन्य मजल्या वरील रहिवाशांना बाहेर काढले. रस्त्यावर कोसळलेला मलबा बाजूला केला. परंतु पालिकेचे आपत्कालीन पथक मात्र चक्क अर्ध्या तासाने आले. पथकातील कर्मचाऱ्यांकडे अवजार - साहित्यदेखील नव्हते असे उपस्थित लोकं म्हणाली. इमारत रिकामी करण्यात आली असून तांत्रिक तपासणी करून घेण्यास पालिकेने रहिवाशांना सांगितले आहे. 
 

Web Title: The elderly woman collapsed in Meera Bhayander with the gallery of the building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.