टोलनाक्यांवरील वाहतूक कोंडी खपवून घेणार नाही, पिवळ्या पट्टीचे पालन करण्याचे एकनाथ शिंदे यांचे सक्त निर्देश 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2017 07:17 PM2017-12-23T19:17:33+5:302017-12-23T19:19:35+5:30

सलग सुट्यांमुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या वाहतूक कोंडीची दखल घेऊन ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे आणि ऐरोली येथील टोलनाक्यांना भेटी देऊन कुठल्याही परिस्थितीत टोल नाक्यांवर वाहतूक कोंडी होता कामा नये, असे आदेश दिले.

Eknath Shinde's strict instructions to follow the yellow band will not be tolerated the traffic on tollanakas | टोलनाक्यांवरील वाहतूक कोंडी खपवून घेणार नाही, पिवळ्या पट्टीचे पालन करण्याचे एकनाथ शिंदे यांचे सक्त निर्देश 

टोलनाक्यांवरील वाहतूक कोंडी खपवून घेणार नाही, पिवळ्या पट्टीचे पालन करण्याचे एकनाथ शिंदे यांचे सक्त निर्देश 

Next

ठाणे – कळवा पुलाच्या दुरुस्तीमुळे वाहतुकीवर घालण्यात आलेले निर्बंध, हार्बर रेल्वेने घेतलेला मेगाब्लॉक आणि जोडून आलेल्या सुट्या यामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या वाहतूक कोंडीची दखल घेऊन ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे आणि ऐरोली येथील टोलनाक्यांना भेटी देऊन कुठल्याही परिस्थितीत टोल नाक्यांवर वाहतूक कोंडी होता कामा नये, असे आदेश दिले.

नवी मुंबईहून एरवी विटावा मार्गे ठाण्यात येणाऱ्या वाहनधारकांना कळवा पुल बंद असल्यामुळे ऐरोली मार्गे येताना त्यांनी ऐरोली येथे टोल भरल्यास ती पावती पाहून ठाणे येथील टोलनाक्यावर टोल वसूल न करण्याच्या सूचनाही श्री. शिंदे यांनी टोल कंत्राटदाराला दिल्या आहेत. ऐरोली येथील टोलनाक्यावर दोन्ही दिशेकडे टोलवसुलीसाठी प्रत्येकी दोन लेन वाढवण्याचे आदेश देतानाच ऐरोली आणि ठाणे येथील टोलनाक्यांवर पिवळ्या पट्टीच्या नियमाचे पालन न केल्यास कठोर कारवाईचा इशाराही श्री. शिंदे यांनी दिला.

कळवा येथील पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे कळव्याकडून ठाण्यात येणारी वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे ऐरोलीमार्गे ठाण्यात येणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यातच हार्बर मार्गावरील मेगाब्लॉक आणि जोडून आलेल्या सुट्या यामुळे अनेकजण बाहेरगावी निघाल्यामुळेही मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होत आहे. त्याचे परिणाम टोलनाक्यांवर दिसू लागताच सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री आणि ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी टोलनाक्यांवर धाव घेत पिवळ्या पट्टीच्या नियमाचे कठोर पालन करण्याचे आदेश दिले. ठाणे येथील टोलनाक्यांवर मनुष्यबळ आणि टोलवसुलीच्या मशिन्सची संख्या वाढवण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच, ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली असता आज रात्रीपर्यंत कळवा ब्रिज वाहतुकीसाठी खुला करण्याची ग्वाही जयस्वाल यांनी दिली.
 

Web Title: Eknath Shinde's strict instructions to follow the yellow band will not be tolerated the traffic on tollanakas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.