कोनफळ कचोरी... ड्रायफ्रुट मलई मटका लस्सी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 11:22 PM2017-07-25T23:22:22+5:302017-07-25T23:23:23+5:30

DryFrut Malai lassi | कोनफळ कचोरी... ड्रायफ्रुट मलई मटका लस्सी!

कोनफळ कचोरी... ड्रायफ्रुट मलई मटका लस्सी!

Next

ठाणे : श्रावण सुरू झाला, की उपाहारगृहात, घरगुती खाद्यपदार्थ मिळणाºया दुकानांत उपवासाच्या पदार्थांची रेलचेल सुरू होते. उपवासातही खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी साबुदाणा बटाटा पुरी, कोनफळ कचोरी, ड्रायफ्रुट मलई मटका लस्सी अशा नव्या पदार्थांची भर पडली आहे.
यंदा हॉटेल्समधील खाद्यपदार्थांना जीएसटीचा चटका बसला असला, तरी उपाहारगृहातील उपवासाच्या पदार्थांना जीएसटीची झळ पोचली नसल्याचे दुकानमालकांचे म्हणणे आहे.
श्रावणात उपहारगृहांबरोबरच घरोघरी उपवासाच्या पदार्थांची रेलचेल असते. सोमवार, गुरूवार, शुक्रवार, शनिवार अशा त्या-त्या वाराच्या उपवासानुसार वेगळे पदार्थही केले जातात. यातील तळणाचे काही पदार्थ, उपवासाची भाजणी बºयाचदा रेडीमेड आणली जाते. साबुदाणा खिचडी, वºयाचे तांदूळ, साबुदाणा वडे यासारखे पदार्थ घरी बनवले जातात.
पण ग्राहकांना श्रावणानिमित्त वेगळे काही हवे असते, हे लक्षात घेता त्याप्रमाणे उपहारगृहांत पदार्थ बनवले जातात. काही पदार्थ हे त्याच दिवशी तर काही पदार्थांची तयारी आदल्यादिवशी होते. थालीपीठ, उपवासाची मिसळ, उपवासाची कचोरी, राजगिरा लाडू, राजगिरा चिक्की, राजगिरा रोल, खजूर रोल, शेंगदाणा लाडू यासारख्या पदार्थांना अधिक मागणी असते. उपवासाच्या भाजणीपासून तयार करण्यात आलेल्या रुचकर, खमंग थालीपीठाला खवय्ये चांगलीच पसंती देतात.
श्रावणात साबुदाण्याची खिचडी, बटाट्याची भाजी, शेंगदाण्याची आमटी, बटाटा-रताळ््याचे काप, कचोरी असे पदार्थ खाऊन कंटाळलेल्या खवय्यांसाठी यंदा उपाहारगृहांत नवे पदार्थ आहेत. काही ठिकाणी राजगिºयाच्या पुºया श्रीखंडाचा बेत असतो. कुठे उपवासाचे डोसे, इडली मिळते. उपवासाचा बटाटा वडा, फराळी मिसळ, खरवस, उपवासाची पुरी भाजी, बटाटा पुरी, फ्रेंच फ्राइजसारखे बटाट्याचे खुसखुशीत काप, ओल्या नारळाची तिखट कचोरी, कटलेट, उपवास स्टफ पॅकेज, मसाला दूध, लस्सी, पियुष यांचा समावेश असतो.
उपवासाच्या थाळीत वºयाचा भात, शेंगदाण्याची आमटी, बटाट्याची भाजी, उपवासाची पुरी, श्रीखंड अशा पदार्थांचा समावेश असतो. ही थाळी केळीच्या पानात दिली जाते, असे उपहारगृहाचे मालक केदार जोशी यांनी सांगितले. नेहमीच्या पुरीपेक्षा वेगळी साबुदाणा-बटाटा पुरी हे यंदाचे वैशिष्ट्य आहे. कोनफळ नेमाने खाल्ले जात नाही. पण त्याची कचोरी सुंदर लागते आणि लस्सीत नेहमीच्या मँगो, चॉकलेट फ्लेवरपेक्षा ड्रायफ्रूट-मलईचा समावेश पोटभरीचा होतो. त्यातही ती छोट्या मटक्यात दिली, तर तिची रंगत वाढते. त्यामुळे यंदाचा ठाणेकरांचा उपवास वेगळ््या चवीचा, वेगळ््या ढंगाचा होण्याची चिन्हे आहेत.

Web Title: DryFrut Malai lassi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.