ठाणे जिल्ह्यातील ग्राहकांच्या ज्ञानोंद्रीया... विषयावर डॉ. प्रभुदेसाईना ‘पीएचडी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 05:02 PM2019-07-02T17:02:55+5:302019-07-02T17:13:48+5:30

‘ठाण्यातील विद्या प्रसारक मंडळाच्या के. ग. जोशी कला आणि ना.गो . बेडेकर वाणिज्य’ या वरिष्ठ महाविद्यालयात डॉ. प्रभुदेसाई कॉमर्स शाखेच्या विद्यार्थ्यांना विद्यादान करीत आहेत. त्यांनी आतापर्यंत एम .कॉम , एम . फिल ., एम .बी. ए. ( मार्केटिंग), सेट , बी.एड इत्यादी पदव्या अत्यंत कष्टपूर्वक मिळविल्या आहेत.

Dr. Jnanandriya of the customers of Thane district ... Prabhudasaina 'PhD' | ठाणे जिल्ह्यातील ग्राहकांच्या ज्ञानोंद्रीया... विषयावर डॉ. प्रभुदेसाईना ‘पीएचडी’

ठाणे जिल्ह्यातील ग्राहकांच्या ज्ञानोंद्रीया... विषयावर डॉ. प्रभुदेसाईना ‘पीएचडी’

Next
ठळक मुद्देडॉक्टरेट पदवी संपादन पाच वर्षे अत्यंत मेहनतपूर्वकअभ्यासपूर्ण विषयावर मुंबई विद्यापीठाची पीएचडी

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील ग्राहकाच्या खेरीदी विषयी ठाणे येथील प्राध्यापिका डॉ. अर्चना प्रभुदेसाई यांना ‘ग्राहकांच्या ज्ञानोंद्रीयांचा त्यांच्या अल्पायुषी (नॉन ज्युरेबल) वस्तुंच्या खरेदी निर्णयावर होणाऱ्या प्रभावाचा अभ्यास - ठाणे जिल्हा अर्तगत’ या अभ्यासपूर्ण विषयावर मुंबई विद्यापीठाने पीएचडी म्हणजे डॉक्टरेट (विद्यावाचस्पती) आज प्रदान केली आहे. या मुळे त्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे
         ‘ठाण्यातील विद्या प्रसारक मंडळाच्या के. ग. जोशी कला आणि ना.गो . बेडेकर वाणिज्य’ या वरिष्ठ महाविद्यालयात डॉ. प्रभुदेसाई कॉमर्स शाखेच्या विद्यार्थ्यांना विद्यादान करीत आहेत. त्यांनी आतापर्यंत एम .कॉम , एम . फिल ., एम .बी. ए. ( मार्केटिंग), सेट , बी.एड इत्यादी पदव्या अत्यंत कष्टपूर्वक मिळविल्या आहेत. या यशस्वी वाटचालीनंतर त्यांनी ठाणे जिल्ह्यातील ग्राहकांच्या खरेदीतील ज्ञाना विषयी डॉ. प्रा. किशोरी भगत यांच्या मार्गदर्शनाखाली ही डॉक्टरेट पदवी संपादन केली आहे. गेली पाच वर्षे अत्यंत मेहनतपूर्वक, चिकाटीने, संशोधकवृत्तीने डॉ. प्रभुदेसाई यांनी ग्राहकांच्या विषयावर संशोधन केले.
            ठाणे जिल्ह्यातील ग्राहकांच्या खरेदीच्या ज्ञानावरील नाविण्यपूर्ण संशोधनासाठी डॉक्टरेट पदवी मुंबई विद्यापिठाने सन्मानपूर्वक डॉ. प्रभुदेसाई यांना प्रदान केली आहे. या विषयी त्या म्हणाल्या की ‘आजचा दिवस माझ्या दृष्टिने अत्यंत महत्वाचा असून माझ्या यशाचे श्रेय माझ्या कुटुंबियाना , माझ्या महाविद्यालयाला तसेच संशोधनासाठी सतत प्रोत्साहन देणारे डॉ. विजय बेडेकर आणि होकारात्मक दिशेने मार्गदर्शन करणा-या प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक यांना आहे’ असे त्यांनी लोकमतला सांगितले.
............
फोटो - ०२ठाणे डॉ. प्रभुदेसाई

Web Title: Dr. Jnanandriya of the customers of Thane district ... Prabhudasaina 'PhD'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.