डोंबिवली पूर्व-पश्चिमेचा पाणी पुरवठा उद्या बंद राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 04:27 PM2018-07-02T16:27:07+5:302018-07-02T16:27:23+5:30

कल्याण-डोंबिवली महापालिकेतील डोंबिवली पूर्व-पश्चिमेला होणारा पाणी पुरवठा उद्या मंगळवारी चोवीस तास बंद ठेवण्यात

Dombivli East-West water supply will be closed tomorrow | डोंबिवली पूर्व-पश्चिमेचा पाणी पुरवठा उद्या बंद राहणार

डोंबिवली पूर्व-पश्चिमेचा पाणी पुरवठा उद्या बंद राहणार

googlenewsNext

डोंबिवली- कल्याण-डोंबिवली महापालिकेतील डोंबिवली पूर्व-पश्चिमेला होणारा पाणी पुरवठा उद्या मंगळवारी चोवीस तास बंद ठेवण्यात येणार आहे अशी माहिती उपअभियंता अनिरूध्द सराफ यांनी दिली. डोंबिवलीला पाणी पुरवठा करणाऱ्या नेतिवली व मोहिली जलशुध्दीकरण केंद्रात देखभाल दुरूस्ती असल्याने आज रात्री १२ ते मंगळवार ३ जुलै रात्री १२ पर्यंत पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
पाणी पुरवठा चोवीस तास बंद ठेवण्यात येणार असल्याने नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा व पुरेसा साठा करून ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. मात्र कल्याण येथे पाणी पुरवठा सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Dombivli East-West water supply will be closed tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी