ज्ञानेश्वर महाराज हे पहिले बंडखोर, अशोक शहाणे यांचे आख्यान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 05:25 AM2018-04-02T05:25:51+5:302018-04-02T05:26:04+5:30

‘कुंडली बघून मुलीचे लग्न जुळवण्याइतके भाषांतर करणे सोपे नाही. तसे करणाऱ्यांनी या फंदात पडू नये’, असा थेट हल्ला चढवत ‘माझ्या मºहाठीचिये बोल कवतिके। परि अमृतातेहि पैजा जिंके’ असे लिहून ज्ञानेश्वर महाराजांनी देवाची भाषा समजल्या जाणाºया संस्कृतविषयी बंड केले, ते कुणी का सांगत नाही, असा थेट सवाल ज्येष्ठ भाषा अभ्यासक, सुप्रसिद्ध साहित्यिक, कला अभ्यासक अशोक शहाणे यांनी त्यांच्या ‘आख्याना’त केला.

 Dnyaneshwar Maharaj was the first rebel, Ashok Shahane's saga | ज्ञानेश्वर महाराज हे पहिले बंडखोर, अशोक शहाणे यांचे आख्यान

ज्ञानेश्वर महाराज हे पहिले बंडखोर, अशोक शहाणे यांचे आख्यान

googlenewsNext

ठाणे : ‘कुंडली बघून मुलीचे लग्न जुळवण्याइतके भाषांतर करणे सोपे नाही. तसे करणाऱ्यांनी या फंदात पडू नये’, असा थेट हल्ला चढवत ‘माझ्या मºहाठीचिये बोल कवतिके। परि अमृतातेहि पैजा जिंके’ असे लिहून ज्ञानेश्वर महाराजांनी देवाची भाषा समजल्या जाणाºया संस्कृतविषयी बंड केले, ते कुणी का सांगत नाही, असा थेट सवाल ज्येष्ठ भाषा अभ्यासक, सुप्रसिद्ध साहित्यिक, कला अभ्यासक अशोक शहाणे यांनी त्यांच्या ‘आख्याना’त केला.
ठाणे महानगरपालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात रविवारी सायंकाळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि साद या संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात शहाणे यांना ज्येष्ठ पत्रकार अंबरीश मिश्र यांनी बोलते केले. साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर या मुक्तसंवादाचे साक्षीदार झाले.
‘लिहित का नाहीत?’ या प्रश्नापासून सुरू झालेल्या या संवादात शहाणे यांच्या वाङ्मयीन चळवळीचे, त्यांनी केलेल्या बंडखोरीचे, भाषावैभवाचे, भाषासंस्कृतीच्या चिकित्सेचे अवाक् करणारे संचित त्यांनी रिते केले. ‘साताºयात असताना शाळा संपली की संघाच्या शाखेत जायचो. तिथे गटवार उभं केलं जायचं. प्रार्थना व्हायची. त्याआधी वर्तमानपत्रातले उतारे वाचून दाखवले जायचे. ते नथुराम गोडसेच्या विचाराचे असायचे. एकदा मी काहीतरी प्रश्न विचारला, त्यामुळे खाडकन थोबाडीत ठेवून दिली. मोकळा वेळ भरून काढायला जाणाºया मला जर थोबाडीत खावी लागत असेल तर कशाला जायचे, म्हणून संघात जाणे बंद केले, ती पठडीबाहेर पडण्याची सुरुवात होती.’ असे सांगत शहाणे यांनी अनेक बंडांचे अनुभवकथन केले.
‘पुढील शिक्षणासाठी पुण्यात आलो. तिथे कॉलेजपेक्षा ‘गूडलक’ कॅफेवर रंगणाºया मैफलीतच अधिक शिक्षण मिळाले,’ असे सांगत मासिक संपादन करण्याची मिळालेली संधी, ‘रसरंजन’ अंकाच्या संपादनाचे अनुभव, भल्याभल्यांनी अंकाचे केलेले कौतुक, जीएंनी पाठवलेले पत्र, भाऊ पाध्येंच्या ‘वासू नाका’ची, चि. त्र्यं. खानोलकरांच्या कादंबरीची, अनेकांशी उडालेल्या खटक्यांची गोष्ट सांगत जुन्या आठवणींचा एक समृद्ध कॅनव्हास अशोक शहाणे यांनी चित्रबद्ध केला.
बंगाली भाषेतील अनेक कलाकृतींचे मराठीत भाषांतर करणारे शहाणे यांनी त्याविषयीच्या अनेक आठवणी सांगितल्या. ‘कुंडली पाहून मुलीचे लग्न जुळवण्याइतके भाषांतर करणे म्हणजे सोपे नाही. अनुवाद करताना काही पथ्ये पाळायची असतात. ज्या भाषेत ती गोष्ट असते, तिथले ते कल्चर असते. अनुवाद करताना त्या परंपरेच्या जवळ जाणारी आपली संस्कृती शोधावी लागते. तेव्हा ती आपल्याला जवळची वाटते. त्यासाठी तिथली संस्कृती, त्यासाठी वापरलेले शब्द समजून घेण्याची गरज असते,’ असे शहाणे म्हणाले. बंगालीत टागोर तर मराठीत कोण? या प्रश्नावर शहाणे म्हणाले, तुकाराम आहेत, पण वाचतो कोण? त्यांची कविता ३०० वर्षांपूर्वीची आहे, तरी ती जेव्हा वाचतो तेव्हा जिवंत होते.
संस्कृतविषयी बोलताना शहाणे म्हणाले, संस्कृत जर देवाची भाषा म्हणावी इतकी समृद्ध असेल, तर मराठी निपजली नसती. ‘प्राकृत’ ही संस्कृत भाषेतील शिवी आहे, असे सांगत त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या ‘अमृतातेहि पैजा जिंके’चा संदर्भ देऊन, ज्ञानेश्वर महाराजांनी केलेले ते बंड आहे, असे विवेचन केले.
पुढील संवाद ढाले यांच्याशी
‘साद’ ही संस्था पुढचा संवाद प्रसिद्ध साहित्यिक राजा ढाले यांच्याशी साधणार असून, संवादक प्रसिद्ध कवयित्री डॉ. प्रज्ञा पवार असणार आहेत.
‘ण’ व ‘न’ म्हणणाºयांवर ताशेरे
‘बाणा’तल्या ‘ण’ला ‘न’ म्हणणाºयांना नाव ठेवणारे ‘प्रश्ना’तल्या ‘न’चा ‘ण’ उच्चार करतात. त्यांचे काय करायचे, असा उलट प्रश्न विचारून, त्यांनी या संवादाची सांगता केली आणि सभागृह ‘प्रश्न’तला ‘न’ उच्चारण्याचा सराव करू लागले.

शिवाजी महाराज आणि तुकाराम समकालीन

आजची परिस्थिती लेखक, कलावंतांसाठी चांगली नाही. आणीबाणीची परिस्थिती आहे, आपणास काय वाटते? या प्रश्नावर व्यक्त होताना शहाणे म्हणाले, ‘आपल्याकडे ही परिस्थिती नेहमीच असते. शिवाजी महाराज आणि तुकाराम समकालीन होते’ असे सांगत त्यावेळीही तुकाराम महाराजांच्या गाथा बुडवण्यात आल्याची आठवण उपस्थितांना झाली.

Web Title:  Dnyaneshwar Maharaj was the first rebel, Ashok Shahane's saga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.