विठोबारूपी गणेशमूर्तींना मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 02:57 AM2018-07-19T02:57:31+5:302018-07-19T02:57:49+5:30

एखादी मालिका किंवा सिनेमातील गाजलेल्या भूमिकेच्या रूपातील गणेशमूर्ती बनवण्याचे फॅड गेल्या काही वर्षांपासून वाढल्याने यंदा ‘विठुमाऊली’ मालिकेच्या प्रभावामुळे विठ्ठलाच्या रूपातील गणेशमूर्तींची मागणी वाढली आहे.

Demand for Ganesh idols | विठोबारूपी गणेशमूर्तींना मागणी

विठोबारूपी गणेशमूर्तींना मागणी

googlenewsNext

- प्रज्ञा म्हात्रे 
ठाणे : एखादी मालिका किंवा सिनेमातील गाजलेल्या भूमिकेच्या रूपातील गणेशमूर्ती बनवण्याचे फॅड गेल्या काही वर्षांपासून वाढल्याने यंदा ‘विठुमाऊली’ मालिकेच्या प्रभावामुळे विठ्ठलाच्या रूपातील गणेशमूर्तींची मागणी वाढली आहे. यापूर्वी ‘जय मल्हार’, ‘बाहुबली’, ‘बाजीराव’ यांच्या रूपांतील गणेशमूर्तींनी ठाणेकरांवर गारूड केले होते. सध्या गणेशमूर्ती बनवण्याचे काम सुरू असून विठ्ठलरूपातील मूर्ती साकारण्यात मूर्तिकार गुंतले आहेत. वारकऱ्यांनीही याच मूर्तींना पसंती दिली आहे.
विठोबारूपी २२ मूर्तींचे बुकिंग झाले असून बुकिंग करणाºयांमध्ये सहा ते सात वारकºयांचा समावेश असल्याचे मूर्तिकार अरुण बोरीटकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले. सव्वादोन फुटांपासून सात फुटांपर्यंत या मूर्ती बनवल्या जात असून त्यांची किंमत सव्वातीन, साडेतीन हजारांपासून २८ हजार रुपयांपर्यंत आहे. विठोबाच्या रूपातील मूर्तींपाठोपाठ श्री स्वामी समर्थांच्या रूपातील गणेशमूर्तींनादेखील मागणी आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दगडूशेठ हलवाई, लालबागचा राजा, टिटवाळा चिंतामणी, सिंहासनावर आरूढ झालेला, पगडीतील गणेशमूर्तींनाही मागणी आहे.
>जीएसटीचा परिणाम मूर्तींच्या दरांवर
देशभरात लागू असलेला जीएसटी, कामगारांचे वाढलेले पगार, रंगांचे व पीओपीचे वाढलेले दर यामुळे यंदा मूर्तींच्या दरात १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी सव्वा फुटाची मूर्ती १५०० रुपयांना विकली होती. यंदा याच मूर्तींचे दर १७०० रुपये आहेत. मूर्तींचे दर वाढले आहेत. गणेशभक्तांना महागड्या दराने मूर्ती विकणे हे आम्हाला पटत नसले, तरी नाइलाजाने विकावे लागते, असे बोरीटकर यांनी सांगितले.
<आता रंगकामास सुरुवात
दोन महिन्यांवर गणेशोत्सव आल्याने आता जवळपास मूर्ती बनवण्याचे काम संपले असून रंगकामास सुरुवात झाली आहे. पावसाचा अंदाज घेऊन कामाचा वेग वाढवला जात असल्याचे मूर्तिकारांनी सांगितले.

Web Title: Demand for Ganesh idols

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.