अक्षयतृतीयेसाठी कस्टमाइज्ड ज्वेलरीला पसंती, मोत्यांचे, रंगीबेरंगी, नवग्रहांचे दागिने बाजारात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2019 02:00 AM2019-05-05T02:00:43+5:302019-05-05T02:00:55+5:30

साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या अक्षयतृतीयेच्या दिवशी सोनेखरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. या सणानिमित्ताने सोनेचांदीच्या व्यापाऱ्यांनी कस्टमाइज्ड ज्वेलरी ग्राहकांसाठी उपलब्ध केली आहे.

Customized jewelery likes, pearls, colorful, ornaments ornaments in the market | अक्षयतृतीयेसाठी कस्टमाइज्ड ज्वेलरीला पसंती, मोत्यांचे, रंगीबेरंगी, नवग्रहांचे दागिने बाजारात

अक्षयतृतीयेसाठी कस्टमाइज्ड ज्वेलरीला पसंती, मोत्यांचे, रंगीबेरंगी, नवग्रहांचे दागिने बाजारात

Next

ठाणे - साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या अक्षयतृतीयेच्या दिवशी सोनेखरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. या सणानिमित्ताने सोनेचांदीच्या व्यापाऱ्यांनी कस्टमाइज्ड ज्वेलरी ग्राहकांसाठी उपलब्ध केली आहे. मोत्यांचे, रंगीबेरंगी, नवग्रहांचे दागिने तसेच दक्षिण भारतीय ज्वेलरीकडे यंदा ग्राहकांचा कल असल्याचे या व्यापाºयांनी लोकमतला सांगितले.

या आठवड्यातील मंगळवारी अक्षयतृतीया हा सण आला आहे. बहुतांशी लोक या दिवशी सोनेखरेदी करणे शुभ मानतात. गेल्या काही दिवसांपूर्वी सोन्याचा भाव ३४ हजार ५०० रुपयांवर होता. आता तो ३१ हजार ६०० रुपयांवर आल्याने सोन्याची खरेदी होईल, अशी आशा व्यापाºयांकडून व्यक्त केली जात आहे. या दिवशी अनेक लोक सोने खरेदी करत असल्याने त्यांच्यासाठी व्यापारी नवनवीन डिझाइन्स बाजारात आणत असतात.

दागिने ही गुंतवणूक
ग्राहक नवीन काय पॅटर्न आलेत, ते बघून आपापल्या ऐपतीप्रमाणे दागिन्यांची खरेदी करतात आणि दागिने ही गुंतवणूक आहे, खर्चिक नाही, अशा दृष्टिकोनातूनच खरेदी केली जात असल्याचे जैन म्हणाले. उन्हाळा पाहता अक्षयतृतीयेच्या दिवशी सायंकाळी ६ नंतर खरेदी जास्त प्रमाणात होईल, असे निरीक्षण या व्यापाºयांनी नोंदवले. १५ मे नंतर खरेदीचे प्रमाण घटणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

गुंतवणूक म्हणून सोन्याची नाणी घेण्यापेक्षा ज्वेलरी घेण्याला ग्राहकांची पसंती आहे. हेच हेरून व्यापाºयांनी स्वत:चे डिझाइन्स बाजारात आणले आहे. १० ग्रॅमपासून ते ५० ग्रॅमपर्यंत वजनाच्या या डिझाइन्स तयार केल्या आहेत.
सध्या सोन्यात मोत्यांचे हार, नवग्रहांच्या ज्वेलरीचा ट्रेण्ड आहे, असे कमलेश जैन यांनी सांगितले. दुसरीकडे दक्षिण भारतीय पॅटर्नमध्ये मंगळसूत्र ते मोठ्या हारांची खरेदी होत आहे.

१५ ते २० दिवसांपासून ग्राहकांनी
आगाऊ बुकिंग केली आहे आणि त्याची खरेदी ते ७ मे रोजी म्हणजेच अक्षयतृतीयेच्या दिवशी करणार आहेत, अशी माहिती तेजस सावंत यांनी दिली. यंदा २० टक्के सोन्याची नाणी आणि ८० टक्के ज्वेलरी असे प्रमाण असल्याचे सावंत म्हणाले.
 

Web Title: Customized jewelery likes, pearls, colorful, ornaments ornaments in the market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे