पोलीस आयुक्तांनी दिला गुन्हा दाखल करण्याचा इशारा

By धीरज परब | Published: April 15, 2024 07:41 PM2024-04-15T19:41:54+5:302024-04-15T19:43:03+5:30

मीरारोड - मीरा भाईंदर - वसई, विरार पोलीस आयुक्तालयचे आयुक्त मधुकर पांडेय यांनी समाज माध्यमांवर तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट ...

Commissioner of Police warned to file a case | पोलीस आयुक्तांनी दिला गुन्हा दाखल करण्याचा इशारा

पोलीस आयुक्तांनी दिला गुन्हा दाखल करण्याचा इशारा

मीरारोड - मीरा भाईंदर - वसई, विरार पोलीस आयुक्तालयचे आयुक्त मधुकर पांडेय यांनी समाज माध्यमांवर तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट बद्दल गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. 

मीरा भाईंदर परिसरामध्ये गेल्या वर्षा पासून धार्मिक तेढच्या घटना घडून दंगल, तोडफोड सारख्या घटना घडत आहेत. त्याची गंभीर दखल पोलीस आयुक्तांनी घेतली आहे. दोन धर्मीयांमध्ये,समाजामध्ये, गटामध्ये तेढ निर्माण होईल या पद्धतीने कोणत्याही प्रकारचे मेसेज मोबाईल,व्हाट्सअप, ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक, युट्युब व इतर सोशल मीडियावर मेसेज तयार करून प्रसारित करेल तसेच आलेल्या मेसेजला लाईक करेल व सदर मेसेज वर कमेंट करेल व अशा कृत्यामुळे दोन वेगवेगळ्या धर्मीयांच्या, गटाच्या व समाजाच्या भावना दुखावून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास मेसेज तयार करणारा, प्रसारित करणारा, लाईक करणारा  व त्यावर कमेंट करणारे व्यक्तींना जबाबदार धरण्यात येईल. त्यांच्यावर भादंविमधील तब्बल ९ विविध कलमांखाली तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा व इतर संबंधित कायद्यान्वये गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस आयुक्तांनी दिला आहे. 

Web Title: Commissioner of Police warned to file a case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.