प्रियकराच्या मदतीने महिलेने केली चिमुरड्याची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 09:37 PM2018-01-31T21:37:28+5:302018-01-31T21:41:53+5:30

Chimudara murdered by the woman | प्रियकराच्या मदतीने महिलेने केली चिमुरड्याची हत्या

प्रियकराच्या मदतीने महिलेने केली चिमुरड्याची हत्या

Next
ठळक मुद्देसकाळ पासुन आर्यन दिसत नसल्याने मुलाचे वडील विरेंद्रकुमार याच्या मनांत संशयराकेश पटेल सोबत प्रेमसंबध आल्याने ममताचे दुसरे लग्नप्रियकर राकेश पटेलच्या मदतीने सव्वा वर्षाच्या आयर्नची गळा दाबुन हत्या

भिवंडी : प्रेमसंबंधात अडथळा ठरलेल्या मुलाची प्रियकराच्या मदतीने हत्या करणाºया महिलेस नारपोली पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी अटक केली असुन या घटनेचा सुगावा लागताच प्रियकर फरार झाला आहे.
आर्यन विरेंद्रकुमार यादव(१४ महिने)असे हत्या झालेल्या मुलाचे नांव असुन तो दापोडा ग्रामपंचायत हद्दीतील इंडियन कार्पोरेशन गोदामालगतच्या चाळीत आई ममता व वडील विरेंद्रकुमार यादव यांच्यासह रहात होता. विरेंद्रकुमार यादव व ममता यांचा तीन वर्षांपुर्वी प्रेमविवाह झाला होता. ते दोघे दापोडा गावातील गोदामालगत चाळीत रहात होते. त्यांना आर्यन हा मुलगा झाला. दरम्यान गोदाम परिसरात राहणा-या राकेश पटेल सोबत ममता हिचे प्रेमसंबध जुळून आले. त्यांनी मुलगा आर्यनसह नोव्हेंबर २०१७ मध्ये दापोडा गावातून पळ काढून लग्न केले आणि काही दिवसानंतर पुन्हा त्याच परिसरांत राकेश पटेल याच्या घरांत रहाण्यास आले.
आज बुधवार रोजी सकाळ पासुन आर्यन दिसत नसल्याने मुलाचे वडील विरेंद्रकुमार याच्या मनांत संशय आल्याने त्याने मुलाबाबत ममताकडे चौकशी केली.तेंव्हा तीने विरेंद्रकुमार यांस उडवाउडवीची उत्तरे दिली.त्यामुळे विरेंद्रकुमारने नारपोली पोलीस ठाणे गाठून आपला मुलगा हरविल्या बाबतची तक्र ार दिली. त्याचा तपास करताना पोलीस ममताच्या घरी येऊन धडकले. पोलीसांनी आपला खाक्या दाखविल्यानंतर ममताने आपल्या सव्वा वर्षाच्या आयर्नची हत्या प्रियकर राकेश पटेलच्या मदतीने गळा दाबुन केल्याची कबूली दिली. तसेच रात्रीच्या अंधारात मुलाचा मृतदेह खाडी लगतच्या किनारी गाडून ठेवल्याचे सांगीतले.
पोलिसांनी ममताला सोबत घेऊन खाडी किनारी गाडलेले मुलाचे प्रेत बाहेर काढले आणि शवविच्छेदनासाठी इंदिरागांधी उपजिल्हा रूग्णालयात पाठविले. या घटनेचा सुगावा लागल्याने ममताचा प्रियकर राकेश पटेल हा फरार झाला असुन पोलीस त्याचा शोध घेत आहेत.या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात ममता व राकेश पटेल यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Chimudara murdered by the woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.