ठाण्यात भाजपाचीही दहीहंडी, मुख्यमंत्री लावणार हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 03:42 AM2018-08-30T03:42:47+5:302018-08-30T03:43:22+5:30

केरळ पूरग्रस्तांना करणार मदत

 Chief minister should give Dahi Handi in Thane, CM should be present | ठाण्यात भाजपाचीही दहीहंडी, मुख्यमंत्री लावणार हजेरी

ठाण्यात भाजपाचीही दहीहंडी, मुख्यमंत्री लावणार हजेरी

Next

ठाणे : ठाण्यात शिवसेना, राष्टÑवादीपाठोपाठ आता भाजपानेही दहीहंडी उत्सवात उडी घेतली आहे. ठाण्यात प्रथमच भाजपाच्या स्वामी प्रतिष्ठानच्या वतीने हिरानंदानी मॅडोज येथे तब्बल नऊ थरांची हंडी उभारली जाणार असून यासाठी पहिले पारितोषिक ११ लाखांचे ठेवले असल्याची माहिती आयोजक शिवाजी पाटील यांनी दिली. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती ही आकर्षण ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या उत्सवाला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, कामगारमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, राज्यमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार विनय सहस्रबुद्धे, खासदार कपिल पाटील, भाजपाचे मुंबईचे अध्यक्ष आमदार अ‍ॅड. आशीष शेलार यांच्यासह सेलिब्रेटी उपस्थित राहतील.
मुंबईतील सर्व गोविंदा पथकांना आमंत्रित केले असून त्यांचा विमा काढण्यात येणार आहे. ३ सप्टेंबरला सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत होणाऱ्या दहीहंडीच्या आदल्या दिवशी म्हणजे २ सप्टेंबरला सेलिब्रेटींची दहीहंडी होणार आहे. यावेळी सुशांत शेलार, शर्मिष्ठा राऊत, रूपाली भोसले, मीरा जोशी, केतकी चितळे, राधा कुलकर्णी, स्मिता शेवाळे, सिया पाटील, मधुरा देशपांडे, प्रीती सदाफुले आणि माधवी निमकर हे कलाकार तसेच अभिजित कोसंबी आणि इतर चार गायक यात सहभागी होतील.

शिक्षणासाठी सात लाखांची मदत
च्सामाजिक समरसता म्हणून दहीहंडीमध्ये केरळमधील पूरग्रस्त आणि महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सात लाखांची आर्थिक मदत मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा केले जाणार असल्याचे सांगितले

च्तसेच उच्च शिक्षण घेणाºया ठाण्यातील १० आदिवासी विद्यार्थ्यांना दत्तक घेण्यात येणार आहे. या उत्सवासाठी मुंबईतील सर्व गोविंदा पथकांना आमंत्रित केले असून त्यांचा विमा काढण्यात येणार आहे. तर २ सप्टेंबर रोजी सेलिब्रिटींची दहीहंडी होणार आहे.

 

Web Title:  Chief minister should give Dahi Handi in Thane, CM should be present

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.