The brother of a conspiracy the religious persuasion, claimed by the family | ताब्यात घेतलेले भाऊ धार्मिक प्रवृत्तीचे, कुटुंबाने केला दावा
ताब्यात घेतलेले भाऊ धार्मिक प्रवृत्तीचे, कुटुंबाने केला दावा

- कुमार बडदे

मुंब्रा : महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने मंगळवारी ताब्यात घेतलेल्या चौघांपैकी दोघे सख्खे भाऊ आहेत. ते धार्मिक प्रवृत्तीचे, चांगल्या विचारांचे असून देशविघातक चळवळीमध्ये सहभागी असतील, यावर विश्वास नसल्याचे त्यांच्या भावाचे म्हणणे आहे.
पॉप्युलर फ्रंट आॅफ इंडियाची औरंगाबाद शाखा कथित संचालित करणारा सलमान आणि मोहसीन खान हे भाऊ आहेत. सलमान उत्कृष्ट फुटबॉलपटू असून मुंब्य्रातून चांगले फुटबॉल खेळाडू तयार व्हावेत, यासाठी प्रयत्नशील होता. मोहसीन इंजिनीअर आहे. दोघेही धार्मिक प्रवृत्तीचे आहेत. इज्तेमा या धार्मिक कार्यक्रमासाठी ते नेहमी औरंगाबादला जात, अशी माहिती त्यांच्या एका भावाने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली.
>ससेमिरा टाळण्यासाठी कुटुंबाने घर सोडले
सलमानच्या लग्नासाठी म्हणून औरंगाबादला गेलेल्या फहाद शेखला ताब्यात घेतल्यानंतर प्रसारमाध्यमे, इतर चौकशीचा ससेमिरा टाळण्यासाठी फहादचे कुटुंब त्यांचे अलमास कॉलनीतील वफा हिल्स या गृहसंकुलातील घर सोडून दुसरीकडे राहण्यास गेल्याची माहिती एका स्थानिक रहिवाशाने दिली.


Web Title: The brother of a conspiracy the religious persuasion, claimed by the family
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.