उल्हासनगर महापालिकेचे रक्तदान शिबिर, महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे स्वच्छेने रक्तदान

By सदानंद नाईक | Published: September 27, 2023 06:59 PM2023-09-27T18:59:43+5:302023-09-27T18:59:55+5:30

सदानंद नाईक, उल्हासनगर: स्वच्छ भारत अभियान अंतर्गत 'स्वच्छता ही सेवा' मोहिमेत महापालिका व वेदांत कॉलेज यांच्या सयुक्त विद्यमाने वेदांत महाविद्यालयात ...

Blood donation camp of Ulhasnagar Municipal Corporation, clean blood donation by college students | उल्हासनगर महापालिकेचे रक्तदान शिबिर, महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे स्वच्छेने रक्तदान

उल्हासनगर महापालिकेचे रक्तदान शिबिर, महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे स्वच्छेने रक्तदान

googlenewsNext

सदानंद नाईक, उल्हासनगर: स्वच्छ भारत अभियान अंतर्गत 'स्वच्छता ही सेवा' मोहिमेत महापालिका व वेदांत कॉलेज यांच्या सयुक्त विद्यमाने वेदांत महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्यासह महाविद्यालयाच्या प्राचार्य संगीता कोळी आदीजन उपस्थित होते.

उल्हासनगर महापालिकेने स्वच्छता अभियान अंतर्गतवेदांत महाविद्यालय व महापालिका यांनी संयुक्तपणे मंगळवारी महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. महापालिका अधिकारी व कर्मचारी तसेच वेदांत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रक्तदान शिबिरात सहभाग घेऊन स्वच्छेने रक्तदान केल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली आहे.

 रक्तदान शिबिराला आयुक्त अजीज शेख यांच्यासह अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त अशोक नाईकवाडे, वेदांत महाविद्यालयाच्या प्राचार्या संगीता कोळी, जनसंपर्क अधिकाती छाया डांगळे, सार्वजनिक आरोग्य अधिकारी मनीष हिवरे, बाजार निरीक्षक विनोद केणे, मुख्य स्वच्छता निरीक्षक एकनाथ पवार यांच्यासह रवींद्र बहेनवाल, विजय बहेनवाल, नरेश परमार, चंदन नारंग यांच्यासह महापालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सर जे.जे. महानगर रक्त केंद्र, राज्य रक्त संक्रमण परिषद (महाराष्ट्र शासन) भायखळा, मुंबई यांच्या वतीने रक्तदाते यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले आहे.

Web Title: Blood donation camp of Ulhasnagar Municipal Corporation, clean blood donation by college students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.