भाजपाच्या मनमानी कारभारामुळे ते नाराज माजी मंडळ अध्यक्ष सेना प्रवेशासाठी आतुर- आ. प्रताप सरनाईक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2017 06:04 PM2017-12-14T18:04:21+5:302017-12-14T18:04:29+5:30

भाईंदर - मीरा-भार्इंदर शहर (जिल्हा) भाजपाच्या मंडळ अध्यक्षांना पक्षांतर्गत कार्यकारी नियुक्तीची प्रक्रिया १८ महिने लांब असतानाच स्थानिक नेतृत्वाने शहरातील १२ निष्ठावंत मंडळ अध्यक्षांना विश्वासात न घेता त्यांची परस्पर पदावरुन हकालपट्टी केली आहे.

With the BJP's arbitrary influence, the former Board president, angry, is eager to enter the army. Pratap Sarnaik | भाजपाच्या मनमानी कारभारामुळे ते नाराज माजी मंडळ अध्यक्ष सेना प्रवेशासाठी आतुर- आ. प्रताप सरनाईक

भाजपाच्या मनमानी कारभारामुळे ते नाराज माजी मंडळ अध्यक्ष सेना प्रवेशासाठी आतुर- आ. प्रताप सरनाईक

Next

राजू काळे
भाईंदर - मीरा-भार्इंदर शहर (जिल्हा) भाजपाच्या मंडळ अध्यक्षांना पक्षांतर्गत कार्यकारी नियुक्तीची प्रक्रिया १८ महिने लांब असतानाच स्थानिक नेतृत्वाने शहरातील १२ निष्ठावंत मंडळ अध्यक्षांना विश्वासात न घेता त्यांची परस्पर पदावरुन हकालपट्टी केली आहे. भाजपाच्या या मनमानी कारभारामुळे नाराज झालेले ते माजी मंडळ अध्यक्ष आपल्या संपर्कात असुन ते सेनेतील प्रवेशासाठी आतुर झाल्याचा दावा सरनाईक यांनी लोकमतकडे व्यक्त केला आहे.

भाजपाच्या स्थानिक नेतृत्वाने प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या सल्ल्याचा आधार घेत कोणालाही विश्वासात न घेता मनमानी कारभार सुरु केला आहे. पालिका निवडणुकीत एकहाती सत्ता मिळविण्यासाठी इतर पक्षातील पदाधिका-यांना पदांचे व उमेदवारीचे गाजर दाखवून निष्ठावंतांची गळचेपी सुरु केली आहे. एकहाती सत्तेचा दुरुपयोग भाजपाकडून होत असून आपल्या शब्दालाच हुकूमी पत्ता ठरवून स्थानिक नेतृत्वाचा मनमानी कारभार चालला आहे. शहरातील विकासाला चालना देणारा विरोधकांचा ठराव बहुमताच्या जोरावर सत्ताधारी अमान्य करीत असुन प्रशासनाच्या मान्यतेलाही मातीमोल ठरवू लागले आहेत. प्रशासन देखील बेकायदेशीर व मनमानी कारभार चालविणा-या सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करीत आहेत. हेच दबावतंत्र भाजपाच्या स्थानिक नेतृत्वाने गटबाजीच्या नावाखाली अवलंबविण्यास सुरुवात केली आहे. पालिका निवडणुकीत निष्ठावंतांनी जीवाचे रान केले. परंतु त्यांना पराभूत करुन समर्थकांच्या विजयासाठी प्रयत्न झाल्याचा आरोप पक्षांतर्गत होऊ लागला आहे. अशातच त्या निष्ठावंतांना पक्षाच्या मुख्यप्रवाहातुनच बाजुला सारण्याची प्रक्रीया स्थानिक नेतृत्वाने केल्याचा आरोप सरनाईक यांनी केला आहे. ओखीप्रमाणेच नमो नमो चे वादळ संपुष्टात येऊ लागले आहे. ओखीने अनेकांचे नुकसान केले तर नमो च्या वादळाने देशातील सर्वांचेच नुकसान केले आहे. त्याची परफेड यंदाच्या जिल्हापरिषदांच्या निवडणुकीत मतदारांनी करण्यास सुरुवात केल्याचा दावा त्यांनी केला आहे. सत्तेचा माज आलेल्या भाजपापासुन मंडळ अध्यक्षपदावरुन पायउतार करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांनी काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला आहे. रिकाम्या झालेल्या मंडळ अध्यक्षपदावर मर्जीतील व सांगकाम्याप्रमाणे कारभार करणाय््राांची वर्णी लावण्यात आल्याने त्या नाराज माजी मंडळ अध्यक्षांनी आपल्याशी संपर्क साधुन शिवसेनेत प्रवेश घेण्याची इच्छा व्यक्त केल्याचे सरनाईक यांनी सांगितले. यामुळे लवकरच भाजपातील त्या नाराजांचा सेनेत अधिकृत प्रवेश होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

Web Title: With the BJP's arbitrary influence, the former Board president, angry, is eager to enter the army. Pratap Sarnaik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.