‘एकसंध देशासाठी भाजपाला हटवा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 05:07 AM2018-04-22T05:07:04+5:302018-04-22T05:07:04+5:30

भारतासारखा एकसंध देश हा भाजपाच्या स्वार्थीपणामुळे पोखरला जात असून याला सर्वस्वी मोदी सरकारच जबाबदार असल्याचा आरोप कवाडे यांनी केला.

'BJP to remove homogeneous country' | ‘एकसंध देशासाठी भाजपाला हटवा’

‘एकसंध देशासाठी भाजपाला हटवा’

googlenewsNext

उल्हासनगर : देशाला एकसंध ठेवण्यासाठी भाजपामुक्त देश करा, असे आवाहन पीआरपीचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकत्रित जयंतीनिमित्त कवाडे शहरात आले होते.
उल्हासनगर पीआरपी पक्षाच्या वतीने कॅम्प नं.-१, जुना बस स्टॉपजवळ हा कार्यक्रम झाला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. कवाडे उपस्थित होते. त्यांनी आपल्या रोखठोक भाषणात मोदी-फडणवीस सरकारवर आसूड ओढले. देशात जातीजातींमध्ये कधी नव्हे एवढा तणाव निर्माण झाला असून नागरिकांची मने कलुषित झाली आहेत. प्रत्येक नागरिक एकमेकांकडे जातीच्या चष्म्यांतून बघू लागला आहे, असे त्यांनी सांगितले.
भारतासारखा एकसंध देश हा भाजपाच्या स्वार्थीपणामुळे पोखरला जात असून याला सर्वस्वी मोदी सरकारच जबाबदार असल्याचा आरोप कवाडे यांनी केला. देशाला ज्ञानाचा मार्ग सांगणारे दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आदींची दिवसाढवळ्या हत्या होऊन अद्याप आरोपी सापडत नाही किंवा त्यांना शोधायचे नाही, अशी टीका त्यांनी केली.
कोरेगाव-भीमा घटनेतील आरोपी सापडत नाही. मात्र, शांततेत महाराष्ट्र बंद करणाऱ्या ५८ हजार दलित नागरिकांवर गंभीर गुन्हे दाखल करून त्यांची धरपकड सुरू केली. शेतकरी, कामगार, दलित, मुस्लिम समाजाची मुस्कटदाबी होत असल्याचे ते म्हणाले.

Web Title: 'BJP to remove homogeneous country'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.