भिवंडी अनधिकृत टेलिफोन एक्सचेंज, सूत्रधारासह तिघांची बँक खाती सील

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2017 07:42 PM2017-11-15T19:42:56+5:302017-11-15T19:43:44+5:30

भिवंडीतील अनधिकृत टेलिफोन एक्सचेंज प्रकरणात अलिकडेच अटक केलेला सूत्रधार वसीम शेख, त्याची पत्नी शहामीन आणि त्याचा साथीदार मोहमद असलम शेख या तिघांचीही बँक खाती गुन्हे अन्वेषण विभागाच्या भिवंडी युनिटने सोमवारी सील केली.

Bhiwandi sealed bank accounts with unauthorized telephone exchange, formula | भिवंडी अनधिकृत टेलिफोन एक्सचेंज, सूत्रधारासह तिघांची बँक खाती सील

भिवंडी अनधिकृत टेलिफोन एक्सचेंज, सूत्रधारासह तिघांची बँक खाती सील

Next

- जितेंद्र कालेकर

ठाणे : भिवंडीतील अनधिकृत टेलिफोन एक्सचेंज प्रकरणात अलिकडेच अटक केलेला सूत्रधार वसीम शेख, त्याची पत्नी शहामीन आणि त्याचा साथीदार मोहमद असलम शेख या तिघांचीही बँक खाती गुन्हे अन्वेषण विभागाच्या भिवंडी युनिटने सोमवारी सील केली. वसीमला परदेशातून मोठ्याप्रमाणात पैसे येत होते. तर शहामीनच्या खात्यात तब्बल १३ लाखांची रोकड आढळल्याची माहिती सूत्रांनी दिली.
वसीमला परदेशातून मिळालेल्या पैशातून तो भिवंडीतील हे अनधिकृत टेलिफोन एक्सचेंज चालविण्यासाठी उलाढाली करीत होता. यातूनच त्याची पत्नी शहामीनच्या भिवंडीतील अ‍ॅक्सिस या बँक खात्यात १३ लाखांची रक्कम आढळली. तर अस्लमच्या एचडीएफसी या बँक खात्यात आठ हजारांची रक्कम आढळली. वसीमचे अ‍ॅक्सिस बँकेत एक एनआरआयसाठीचे आणि एक सामान्य असे दोन खाती आहेत. त्यामध्ये केवळ चार ते पाच हजारांची रक्कम आढळली आहे. त्याच्या खात्यात वेस्टर्न युनियन बँकेतून मोठया प्रमाणात रकमा आल्या आहेत. या रकमा कोणी दिल्या? कोणत्या कोणत्या कारणासाठी? यातील त्याने किती आणि कोणाला वाटप केले? या संपूर्ण प्रकाराची आता राऊत यांच्या पथकाकडून चौकशी सुरू आहे.
या अनधिकृत टेलिफोन एक्सचेंजचा सूत्रधार वसीम शेख याला वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत, सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील आदींच्या पथकाने ४ नोव्हेंबर रोजी ठाण्यातून अटक केली. तर त्यानेच दिलेल्या माहितीवरून ९ नोव्हेंबर रोजी त्याचा साथीदार मोहमद अस्लम शेख याला अटक केली. अस्लमच्या घरझडतीतून अनधिकृत टेलिफोन एक्सचेंज चालविण्यासाठी वापरलेल्या दोन सिमबॉक्स मशिन आणि एक राऊटर जप्त केले आहे. त्याने ते अनधिकृत टेलिफोन एक्सचेंज सुरू करण्यासाठी एका चीनी कंपनीकडून एक लाख २० हजारांमध्ये एक गेटवे (सिम बॉक्स मशिन) खरेदी केली होती. अशा २० मशिन्सची खरेदी करण्यात आली होती. वसीम हा आंतरराष्टÑीय कॉलसाठी १४ ते १६ पैसे प्रति मिनिटप्रमाणे कॉलची विक्री करायचा. यातूनच एका गेटवे (सिम बॉक्स मशिन) मधून महिना ६० ते ७० हजार रुपयांची कमाई केली जायची. अशा २६ मशिन्स पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. काही एक्सचेंज चालविणाºयांकडे या मशिन्स होत्या काहींना त्याने त्या भाड्याने दिल्या होत्या. भिवंडीत त्याने अशा प्रकारे दहा ठिकाणी त्या दिल्या होत्या.
वसीमच्या सिमबॉक्समध्ये इंटरनेट कनेक्शन दिलेले होते. त्यावरून आंतरराष्टÑीय व्हीओआयपी कॉल प्राप्त करण्यासाठी त्यामध्ये बसविलेल्या विविध सिमकार्डद्वारे परदेशातून येणारे आंतरराष्टÑीय कॉल प्राप्त करण्यासाठी सिमबॉक्समध्ये बसविलेल्या विविध सिमकार्डद्वारे परदेशातून येणारे आंतरराष्टÑीय व्हीओआयपी व्हॉइस कॉल हे सेल्युलर नेटवर्कमध्ये डोमॅस्टीक कॉल म्हणून जोडले जातात.
त्यामुळे भारतातील मोबाईलच्या डिस्प्लेवर परदेशातील क्रमांक न येता भारतातील मोबाईल कंपनीचे क्रमांक येतात. त्यामुळे हे फोन कोणत्याही सुरक्षा यंत्रणेलाही सहजा सहजी समजत नाहीत. तसेच या कॉलची नोंद डिपार्टमेंट आॅफ टेलिकम्युनिकेशन या केंद्रीय यंत्रणेलाही होत नसल्याने भारत सरकारचा करोडो रुपयांचा महसूलही बुडतो.
अशा अनधिकृत एक्सचेंजद्वारे होणारे कॉल हे देशविघातक कृत्ये तसेच इतर अवैध कामासांठी वापरला जाण्याची अधिक भिती आहे. ही बाब देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय गंभीर स्वरुपाची असल्याचे भिवंडी युनिटने मंगळवारी (१४ नाव्हेंबर रोजी) भिवंडी न्यायालयाच्या निदर्शनास आणले. वसीम आणि अस्लम या दोघांच्याही पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्यांच्याकडे आणखी तपासासाठी त्यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. तेंव्हा या दोघांनाही १७ नाव्हेंबरपर्यंत ती मिळाली आहे.

अशी झाली कारवाई
भिवंडी युनिटने १० आॅक्टोबरच्या पहाटे १५ ठिकाणी धाडी टाकून अनधिकृतपणे टेलिफोन एक्सचेंज चालविणाºया दहा जणांना अटक केली. त्यांच्याकडून आतापर्यंत २६ सिम बॉक्ससह राऊटर, मोबाईल, लॅपटॉप आणि संगणक असा २६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. वसीममार्फतच राजस्थान आणि भिवंडीतही हे टेलिफोन एक्सचेंज चालविले जात होते. याप्रकणातील आणखी ८ ते १० जणांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

Web Title: Bhiwandi sealed bank accounts with unauthorized telephone exchange, formula

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे