ठाण्याच्या चौपाटीवर बाबा घोडय़ाचा बुडून मृत्यू;मासुंदाची सुरक्षा वा-यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 07:50 PM2017-12-20T19:50:49+5:302017-12-20T20:03:41+5:30

पाण्याचा अंदाज न आल्याने आणि त्या घोडय़ाच्या पायाला दोर अडकल्याने तो बुडला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पाण्यात बुडून घोड्याचा मृत्यु कसा झाला असाच प्रश्न नागरिकांना पडला आहे.

Baba's horse drowning on the Than Chowpatti; After security of Masooda | ठाण्याच्या चौपाटीवर बाबा घोडय़ाचा बुडून मृत्यू;मासुंदाची सुरक्षा वा-यावर

ठाण्याच्या चौपाटीवर बाबा घोडय़ाचा बुडून मृत्यू;मासुंदाची सुरक्षा वा-यावर

googlenewsNext
ठळक मुद्देत्याला वाचविण्यासाठी मालकासह 15 ते 16 जणांना धावलेमंगळवारीच हा घोडा कल्याणच्या एका व्यावसायिकाकडून कुटूंबाचे दागिने विकून खरेदी केला


ठाणे : मनाई असतांनाही अंघोळीसाठी नेलेल्या तीन घोडय़ांपैकी एका 16 वर्षीय घोडय़ाचा ठाण्याची चौपाटी असलेल्या मासुंदा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. बाबा असे या मृत घोडय़ाचे नाव आहे. राबोडीतील युसूफ शेख यांनी मंगळवारीच हा घोडा कल्याणच्या एका व्यावसायिकाकडून कुटूंबाचे दागिने विकून खरेदी केला होता.अशाप्रकारे तलावात घोडय़ाचा बुडून मृत्यू होण्याची ठाण्यातील ही पहिलीच घटना असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
राबोडीतील शेख आणि गांधीनगरमधील फुलचंद जैस्वार तसेच अन्य एक जण असे तिघे जण आपापले घोडे धुण्याबरोबर त्यांना पोहण्यासाठी दुपारच्या सुमारास तलावपाळीच्या दत्त गणोश विसजर्न घाटावर घेऊन आले होते. तिन्ही घोडय़ांना पाण्यात उतरविल्यानंतर बाबा या घोडय़ाला बांधलेला दोर सुटून त्याच्या पायात अडकल्याने तो पाण्यात बुडू लागला. बाबा बुडताना पाहून इतर दोन्ही घोडय़ांना बाहेर काढून त्याला वाचविण्यासाठी मालकासह 15 ते 16 जणांना धाव घेतली. बाबाला कसेबसे काही मिनीटात घाटाच्या पायरीवर पाण्यातून ओढून काढले. मात्र,तोर्पयत त्याच्या नाकातोंडात पाणी गेले होते. पाय-यांवर आणल्यावर तो जिवंत होता असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. पण,नाकातोंडात पाणी गेल्यानेच त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता आहे. तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून शवविच्छेदनासाठी बाबाचे शव भिवंडी येथील प्राण्याच्या रुग्णालयात पाठवले असून याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 

Web Title: Baba's horse drowning on the Than Chowpatti; After security of Masooda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.