जिल्ह्यातील ३४ हजार हेक्टर शेती सिंचनाचा पाणलोट विकास मंजुरी वसुंधरावर आवलंबून!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 07:32 PM2018-11-11T19:32:33+5:302018-11-11T19:37:18+5:30

एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम म्हणून राबवण्यात येत असलेले प्रकल्प आता ‘प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना’या नावे राबवले जात आहेत. समूह पध्दतीने व लोकसहभागातून जिल्ह्यात मृदू व जलसंधारणी कामे हाती घेतली जात आहेत. यामुळे शेती सिंचन वाढवण्यास उपयुक्त ठरणाऱ्या पाणलोट क्षेत्राचा विकास साधला जाणार आहेत. याव्दारे जिल्ह्यात ३४ हजार ५४ हेक्टर क्षेत्रावर उपचार साधण्याचे प्रस्तावित आहेत. यासाठी २०१० ते २०१५ या कालावधीपासून प्रकल्प अहवाल मंजुरीच्या प्रतिक्षेत

Approval of irrigation water over irrigation of 34 thousand hectares in the district is delayed! | जिल्ह्यातील ३४ हजार हेक्टर शेती सिंचनाचा पाणलोट विकास मंजुरी वसुंधरावर आवलंबून!

दोन हजार २२६ हेक्टर क्षेत्रावरील प्रकल्प अहवाल मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत

Next
ठळक मुद्देहाती घेतलेल्या दोन हजार २२६ हेक्टर पाणलोट विकास प्रकल्पासाठी सुमारे १२ कोटी ८३ लाखांचा नियतव्यय मंजूर आहे.एक कोटी ६९ लाखांचा निधी उपलब्ध असून त्यातून केवळ १९ लाख.२९ हजार रूपये खर्च माळरान हिरवे राहील, जंगलात पशुपक्षांसह जनावरांना पाणी उपलब्ध होईल. विहिरींचा पाणी साठा वाढेल.

सुरेश लोखंडे,
ठाणे : जिल्ह्याताील शेती सिंचन वाढवण्यासाठी तब्बल दहा वर्षांपासून पाणलोट विकास हाती घेतला. ३४ हजार ५४ हेक्टर क्षेत्रा विकास प्रस्तावीत आहे. मात्र यापैकी केवळ दोन हजार २२६ हेक्टर क्षेत्रावरील प्रकल्प अहवाल मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत. ते पुणे येथील वसुंधरा विभागाच्या कार्यालयात धूळखात पडून असल्याची गंभीरबाब निदर्शनात आली आहे.
एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम म्हणून राबवण्यात येत असलेले प्रकल्प आता ‘प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना’या नावे राबवले जात आहेत. समूह पध्दतीने व लोकसहभागातून जिल्ह्यात मृदू व जलसंधारणी कामे हाती घेतली जात आहेत. यामुळे शेती सिंचन वाढवण्यास उपयुक्त ठरणाऱ्या पाणलोट क्षेत्राचा विकास साधला जाणार आहेत. याव्दारे जिल्ह्यात ३४ हजार ५४ हेक्टर क्षेत्रावर उपचार साधण्याचे प्रस्तावित आहेत. यासाठी २०१० ते २०१५ या कालावधीपासून प्रकल्प अहवाल मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत. यात ठिकठिकाणच्या तब्बल नऊ मेगा पाणलोट विकास प्रकल्पाचा समावेश आहे. यातील छोटासा भिवंडी तालुक्यातील एक प्रकल्प वर्षभरापूर्वी पूर्ण होऊन तो ग्राम पंचायतीकडे हस्तांतरीत केला.
परंतु या आर्थिक वर्षासाठी तब्बल दोन हजार २२६ हेक्टर क्षेत्राचे उद्ष्ठ आहे. मात्र या पाणलोट विकास क्षेत्राचे प्रकल्प अहवाल मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत. ते पुणे येथील वसुंधरा विभागाच्या प्रतिक्षेत आहेत. यामध्ये कल्याण तालुक्यातील ११८.८० हेक्टर, अंबरनाथमधील ९८२.८३ हेक्टर, मुरबाड तालुक्यामधील २२.५२ हेक्टर क्षेत्रास उपयुक्त ठरणाºया पाणलोट विकास प्रकल्पाचा समावेश आहे. तर शहापूर तालुक्यामधील एक हजार १०२.३४ हेक्टर क्षेत्रापैकी केवळ ६५/५१ एकर क्षेत्राचे काम आतापर्यंत साध्य झाल्याचे. या तालुक्यातील एक पाणलोट समूह सामाजिक वनीकरणमध्ये असून त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल देखील मंजुरीच्या प्रतिक्षेत पुणे येथे पडून आहे.
** या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेच्या कामे गांभीर्याने केल्यास शेतीच्या सिंचन क्षेत्रात वाढ होण्यास मदत होईल. माळरान हिरवे राहील, जंगलात पशुपक्षांसह जनावरांना पाणी उपलब्ध होईल. विहिरींचा पाणी साठा वाढेल.
** हाती घेतलेल्या दोन हजार २२६ हेक्टर पाणलोट विकास प्रकल्पासाठी सुमारे १२ कोटी ८३ लाखांचा नियतव्यय मंजूर आहे. यापैकी एक कोटी ६९ लाखांचा निधी उपलब्ध असून त्यातून केवळ १९ लाख.२९ हजार रूपये खर्च झाल्याचे आढवा बैठकीत उघड झाले.

Web Title: Approval of irrigation water over irrigation of 34 thousand hectares in the district is delayed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.