२२८० झोपडीधारकांना मिळणार हक्काचे घर, आनंदनगरच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 02:38 AM2019-02-07T02:38:08+5:302019-02-07T02:38:19+5:30

ठाण्यातील सर्वात मोठ्या आणि चर्चेत असलेल्या आनंदनगर येथील झोपडपट्टी पुनर्वसनाचा मार्ग आता खऱ्या अर्थाने मोकळा झाला आहे.

Anandnagar Redevelopment news | २२८० झोपडीधारकांना मिळणार हक्काचे घर, आनंदनगरच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

२२८० झोपडीधारकांना मिळणार हक्काचे घर, आनंदनगरच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

Next

ठाणे : ठाण्यातील सर्वात मोठ्या आणि चर्चेत असलेल्या आनंदनगर येथील झोपडपट्टी पुनर्वसनाचा मार्ग आता खऱ्या अर्थाने मोकळा झाला आहे. पुनर्विकासाचा हा प्रस्ताव दोन दिवसांपूर्वीच विकासकाने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे (एसआरए) सादर केला असून यामुळे येथील २२८० झोपडीधारकांना हक्काची घरे मिळण्याची चिन्हे आहेत.
ठाणे शहरातील झोपडपट्ट्यांचा विकास करण्यासाठी चार वर्षांपूर्वी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचा विस्तार करण्यात आला. मुंबई शहरापर्यंत मर्यादित असलेल्या प्राधिकरणामध्ये ठाणे महापालिका क्षेत्राचा समावेश करून त्यासाठी शहरात स्वतंत्र कार्यालय सुरू केले. या कार्यालयामार्फत शहरात झोपड्यांच्या पुनर्विकास प्रस्तावांना मान्यता दिली जात असून आता आनंदनगरमधील झोपड्यांचाही पुनर्विकास करण्यात येणार आहे.
शहरातील १८०० ते १९०० घरे असलेले झोपडपट्ट्यांचे प्रस्ताव प्राधिकरणाकडे यापूर्वी सादर झाले आहेत. त्यामध्ये सुभाषनगर परिसराचा समावेश होता. मात्र, या भागापेक्षाही आनंदनगर भागातील झोपडपट्ट्यांमधील घरांची संख्या २२८० इतकी आहे. त्यामुळे ही शहरातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखली जाते. त्यामुळे या प्रकल्पाच्या माध्यमातून शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
या योजनेसाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रक्रि या उरकून विकासकाने योजनेचा प्रस्ताव प्राधिकरणाकडे दोन दिवसांपूर्वी सादर केला आहे. त्याची प्राधिकरणाच्या विविध विभागांकडून तपासणी केली जाणार असून त्यानंतर त्यास मान्यता दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. असे असले तरी अवघ्या वर्षभरात सर्व प्रक्रि या उरकून योजनेसाठी प्रस्ताव सादर करणारा हा पहिलाच परिसर ठरला असल्याचा दावा संस्थेकडून केला जात आहे.

४२ हजार चौरस मीटरचा विस्तीर्ण भूखंड

आनंदनगर परिसरातील ४२ हजार चौरस मीटर शासकीय जागेवर सुमारे २२८० झोपड्या आहेत. या जागेवर झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवली जाणार आहे. यासाठी रहिवाशांनी दोन संस्था स्थापन केल्या आहेत.
यापैकी आनंदनगर नागरी सहकारी गृहनिर्माण संस्थेने झोपु योजनेसाठी १८०० म्हणजेच ८५ टक्के नागरिकांची संमती मिळवली आहे. तसेच झोपडपट्टीधारकांच्या कुटुंबांची आणि त्यांच्या घराची माहिती नोंद करण्याचे कामही संस्थेने पूर्ण केले आहे. याशिवाय, प्राधिकरणाने या भागात बायोमेट्रिक सर्वेक्षणाचे कामही पूर्ण केले आहे.

ठाणे शहरातील १८०० ते १९०० घरे असलेले झोपडपट्ट्यांचे प्रस्ताव प्राधिकरणाकडे यापूर्वी सादर झाले आहेत. त्यामध्ये सुभाषनगर परिसराचा समावेश होता. मात्र, या भागापेक्षाही आनंदनगर भागातील झोपडपट्ट्यांमधील घरांची संख्या २२८० इतकी आहे. ही शहरातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखली जाते.

Web Title: Anandnagar Redevelopment news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Homeघर