‘त्या’ आंदोलनावरून शिवसेनेत बाचाबाची, शहर आणि शाखाप्रमुखात वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 04:53 AM2017-08-28T04:53:46+5:302017-08-28T04:53:56+5:30

गणेशोत्सवजवळ आलेला असतानाही खड्डे भरण्याचे तसेच पदपथ नूतनीकरणाचे चुकीच्या पध्दतीने सुरू असलेल्या कामाच्या निषेधार्थ शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अनोखे आंदोलन छेडले होते

From the 'agitation' to the Shiv Sena, | ‘त्या’ आंदोलनावरून शिवसेनेत बाचाबाची, शहर आणि शाखाप्रमुखात वाद

‘त्या’ आंदोलनावरून शिवसेनेत बाचाबाची, शहर आणि शाखाप्रमुखात वाद

Next

डोंबिवली : गणेशोत्सवजवळ आलेला असतानाही खड्डे भरण्याचे तसेच पदपथ नूतनीकरणाचे चुकीच्या पध्दतीने सुरू असलेल्या कामाच्या निषेधार्थ शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अनोखे आंदोलन छेडले होते. परंतु हे आंदोलन शिवसेना पदाधिकाºयांच्या जिव्हारी लागले आहे.
या आंदोलनावरून शिवसेनेचे डोंबिवली शहरप्रमुख भाऊसाहेब चौधरी आणिआंदोलन छेडणारे शाखाप्रमुख संदीप नाईक यांच्यात बाचाबाची झाल्याचे वृत्त आहे. या वृत्ताचा चौधरी यांनी इन्कार केला असला तरी नाईक यांनी मात्र दुजोरा दिला आहे.
खड्डयांच्या निषेधार्थ डोंबिवलीकर म्हणून छेडण्यात आलेल्या आंदोलनात प्रतिकात्मक गणपतीची मिरवणूक काढत ती केडीएमसीच्या डोंबिवली विभागीय कार्यालयावर आणली होती. या आंदोलनात शिवमार्केट प्रभागातील शाखाप्रमुख नाईक यांच्यासह मनसेचे समीर पालांडे, राष्ट्रवादीचे राजेंद्र नांदोस्कर आणि २ ते ३ कार्यकर्ते उपस्थित होते. परंतु हे आंदोलन छेडताना त्यांनी त्यांच्या पक्षाचे कोणतेही झेंडे अथवा बॅनर फडकवले नव्हते. एक सर्वसामान्य डोंबिवलीकर म्हणून हे आंदोलन छेडण्यात आल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले होते.
गणपती उत्सवजवळ येऊन ठेपलेला असतानाही रस्ते सुस्थितीत नाहीत, जी कामे केली जात आहेत ती कुचकामी ठरत आहेत त्यामुळे ही कामे चांगल्या पध्दतीने करून रस्ते सुस्थितीत आणावी ही आमची प्रमुख मागणी आहे. त्याचबरोबर मानपाडा रोडवरील पदपथाचे सुरू असलेले काम निकृष्ट पध्दतीने सुरू आहे. ते चांगल्या पध्दतीने करावे याकडे नाईक यांनी लक्ष वेधले होते. महापालिकेत सत्ता असताना शिवसेनेच्या पदाधिकाºयांना वारंवार आंदोलन छेडावे लागत असल्याचे पुन्हा एकदा या घटनेतून समोर आले होते.

Web Title: From the 'agitation' to the Shiv Sena,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.