बांगलादेशीयांना मदत करणा-या एजंटला अटक, एटीएसची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2018 10:12 PM2018-04-10T22:12:57+5:302018-04-10T22:12:57+5:30

भारतात बंदी घालण्यात आलेल्या बांगलादेशी संघटनेच्या एजंटला एटीएसने अंबरनाथमधून अटक करण्यात आली . या प्रकरणाचा तपास सुरू असतांनाच नवी मुंबई एटीएसने एका आरोपीला अंबरनाथमधून अटक केली आहे.

Agent assisted by Bangladeshi agents, arrest of ATS | बांगलादेशीयांना मदत करणा-या एजंटला अटक, एटीएसची कारवाई

बांगलादेशीयांना मदत करणा-या एजंटला अटक, एटीएसची कारवाई

Next

अंबरनाथ : भारतात बंदी घालण्यात आलेल्या बांगलादेशी संघटनेच्या एजंटला एटीएसने अंबरनाथमधून अटक करण्यात आली . या प्रकरणाचा तपास सुरू असतांनाच नवी मुंबई एटीएसने एका आरोपीला अंबरनाथमधून अटक केली आहे. त्या आरोपीने बांगलादेशी नागरिकांना पॅनकार्ड तयार करण्यासाठी तहसिलदार कार्यालयातून बनावट प्रतिज्ञापत्र मिळविण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. अंबरनाथमधील काही एजंट बांगलादेशी नागरिकांना भारतातील ओळखपत्र तयार करुन देण्यासाठी मदत करित असल्याचा संशय नवी मुंबई एटीएसला आहे. त्या आधारावर एटीएस कारवाई करीत आहे. 

एटीएसने अंबरनाथमधून एका बांगलादेशी संघटनेशी संबंधित असलेल्या आणि मुळचा बांगलादेशचा रहिवासी असलेल्या आरोपीला अंबरनाथमधून अटक केली होती. त्यामुळे अंबरनाथमध्ये बांगलादेशी आपली पायमुळे रोवत असल्याचे समोर आले होते. या प्रकरणात आरोपींकडे पॅनकार्ड, आणि आधार कार्ड देखील असल्याचे लक्षात आले होते. हे प्रकरण ताजे असतांनाच नवी मुंबई एटीएसने देखील अंबरनाथमध्ये कारवाई केलेली आहे. पानकार्ड आणि आधार कार्ड काढण्यासाठी लागणारे सत्य प्रतिज्ञा पत्र चुकीच्या मार्गाने मिळविण्यात येत असल्याचे निदर्शनात आले आहे. काही बांग्लादेशी नागरिकांनी पॅन कार्ड तयार करण्यासाठी अंबरनाथ तहसिलदार कार्यालयातून बनावट प्रतिज्ञापत्र मिळवल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात एटीएसने गुन्हा दाखल करत 83 सत्य प्रतिज्ञापत्र धारकांची यादी मागवत प्रविण पाटील या एजंटला अटक केली आहे. 

महिन्याभरापूर्वी मुंबई येथून बांग्लादेशी संघटनेच्या काही लोकांना अटक करण्यात आली होती. त्याचे धागेदोरे नवी मुंबई येथील कामोठे येथे सापडल्याने तेथूनही आठ ते दहा बांग्लादेशीं कामगारांना एटीएसने ताब्यात घेतले होते. मात्र याच तपासात पॅन कार्ड तयार करण्यासाठी काही बांग्लादेशी नागरीकांनी एका एजंट मार्फत अंबरनाथ तहसिल कार्यालयाच्या सेतू मधून बनावट अफीडेव्हीड तयार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी नवी मुंबई एटीएस युनिटने अंबरनाथ तहसिल कार्यालयाच्या सेतू कार्यालयातून अनेक कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. या सर्व प्रकरणात सेतू कार्यालयातील तीन लिपिकही संशयाच्या भोव-यात सापडले आहे. त्यांना तहसीलदारांमार्फत कारणो दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

तसेच त्यांच्या कामाचा अहवाल एटीएसचा पाठवण्यात येणार असून, या तीन्ही कर्मचार्यांची एटीएस मार्फत चौकशी करण्यात येणार आहे. त्यामुळे एजंट आणि सेतू कार्यालयातील कर्मचार्यांतील संबंधाचा फायदा घेत बांग्लादेशी नागरीकांना पॅन कार्ड काढण्यासाठी मदत केली जात असल्याचे  समोर आले आहे.या प्रकरणी येत्या काही दिवसात काही बांग्लादेशींच्या बनावट ओळखपत्नांबाबत मोठा खुलासा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत एटीएसच्या नवी मुंबई युनिटचे प्रभारी पोलिस निरीक्षक शंकर इंदलकर यांना विचारले असता, या प्रकरणी प्रविण पाटील याला अटक करण्यात आली आहे. अधिक तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. 

Web Title: Agent assisted by Bangladeshi agents, arrest of ATS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.