अवमान याचिकेच्या बाताच!, फेरीवालाविरोधी पथक, ‘मनसे’ही थंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 04:00 AM2018-03-14T04:00:19+5:302018-03-14T04:00:19+5:30

उच्च न्यायालयाने फेरीवाल्यांना रेल्वे स्थानकापासून १५० मीटर अंतरापर्यंत व्यवसाय करण्यास मनाई केली आहे. केडीएमसी हद्दीतील अतिक्रमण करणाºया फेरीवाल्यांवर इतरत्र कारवाई सुरू असताना डोंबिवली पूर्वेकडील रेल्वे स्थानक परिसरात मात्र फेरीवाल्यांची मुजोरी कायम आहे.

Against the contempt petition, the anti-hawker squad, 'MNS' too cool | अवमान याचिकेच्या बाताच!, फेरीवालाविरोधी पथक, ‘मनसे’ही थंड

अवमान याचिकेच्या बाताच!, फेरीवालाविरोधी पथक, ‘मनसे’ही थंड

Next

- प्रशांत माने 
डोंबिवली : उच्च न्यायालयाने फेरीवाल्यांना रेल्वे स्थानकापासून १५० मीटर अंतरापर्यंत व्यवसाय करण्यास मनाई केली आहे. केडीएमसी हद्दीतील अतिक्रमण करणाºया फेरीवाल्यांवर इतरत्र कारवाई सुरू असताना डोंबिवली पूर्वेकडील रेल्वे स्थानक परिसरात मात्र फेरीवाल्यांची मुजोरी कायम आहे. यात महापालिकेच्या पथकांसह फेरीवाला हटवण्यासाठी आग्रही असलेली मनसेही थंड पडल्याचे चित्र आहे. केडीएमसीविरोधात अवमान याचिका दाखल करण्याची मनसेची घोषणा अद्यापही कागदोपत्रीच राहिली आहे. त्यामुळे ठोस कृतीअभावी अवमान याचिकेची मनसेची वल्गना केवळ ‘बाता’ च ठरली आहे.
महापालिका पर्यायी जागा देत नाही, तोपर्यंत स्थानक परिसरातच व्यवसाय करणार, असा पवित्रा फेरीवाल्यांनी घेतला आहे. इतर ठिकाणी फेरीवाला हटाव कारवाई जोमाने सुरू असताना डोंबिवली पूर्वेकडील भागात फेरीवाल्यांचे अतिक्रमण कायम आहे. ते हटविण्यात स्थानिक प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे. कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाले हटविण्यात हयगय करणाºया नऊ कर्मचाºयांना आयुक्त पी. वेलरासू यांनी निलंबित केले होते. वेलरासू यांनी डोंबिवलीतही फेरफटका मारून वास्तव पहावे, अशी मागणी होत आहे.
फेरीवाल्यांची मुजोरी इतकी वाढली आहे, की पथकातील अधिकारी, कर्मचारी यांच्याशी हुज्जत आणि त्यांना धक्काबुक्की करण्याचे प्रताप फेरीवाल्यांकडून वारंवार घडत आहेत. मात्र, फेरीवाला हटवण्याची कारवाई प्रभावीपणे होत नसल्याने मनसेने आयुक्त वेलरासू यांना अवमान नोटीस बजावली आहे. मनसेने डोंबिवली, ठाकुर्ली आणि कोपर रेल्वेस्थानक प्रबंधकांनाही सूचना पत्र देऊन यापुढे जर फेरीवाले हटवले नाहीत अथवा तुमच्या कामात हयगय केल्याचे आढळल्यास आपणावर अवमान याचिका दाखल केली जाईल, असा इशाराही दिला आहे. परंतु, अवमान याचिकेची नोटीस देऊनही ठोस कारवाई होत नसल्याने केडीएमसीविरोधात आठवडाभरात अवमान याचिका न्यायालयात दाखल करणार असल्याचे भाष्य मनसेचे महापालिकेतील विरोधीपक्षनेते मंदार हळबे यांनी जानेवारीत केले होते. आमच्याकडून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. लवक रच याचिका दाखल केली जाईल, असेही ते म्हणाले होते. परंतु, अद्यापही याला मुहूर्त मिळालेला नाही. याबाबतची अधिक माहिती घेता कायदेशीर प्रक्रिया अद्याप सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
एकीकडे रेल्वेस्थानक परिसरातील फेरीवाला अतिक्रमणाचे चित्र दिवसागणिक बकाल होत असताना दुसरीकडे मनसेच्या थंड पवित्र्याबाबतच शंका उपस्थित होत आहे. ‘डोंबिवली हे घाणेरडे शहर आहे,’ असे वक्तव्य नुकतेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. याबाबत सत्ताधारी शिवसेना आणि भाजपावर तोंडसुख घेण्यात विरोधीपक्ष मनसेने कुठलीही कसर ठेवली नसताना फेरीवाला अतिक्रमणावर अवमान याचिका दाखल करण्याबाबत इतकी उदासीनता का?, असा सवाल केला जात आहे. याप्रकरणात मनसेच्या ज्येष्ठ पदाधिकाºयांची बोटचेपी भूमिकाही तितकीच कारणीभूत असल्याचेही बोलले जात आहे.
>लवकरच याचिका
या संदर्भात मनसे कल्याण जिल्हा चिटणीस प्रकाश माने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फेरीवाला अतिक्रमणावर ठोस तोडगा निघण्याच्या दृष्टीने आम्ही काही कागदपत्रांची जमवाजमव करत आहोत. बहुतांश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. काही बाबींची पूर्तता व्हायची आहे. ती देखील लवकरच पूर्ण होऊन येत्या चार ते आठ दिवसांत अवमान याचिका दाखल केली जाईल, असा दावा त्यांनी केला.

Web Title: Against the contempt petition, the anti-hawker squad, 'MNS' too cool

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.