वागळे इस्टेट भागात ५७९ क्षमता असलेले वाहनतळ उभे राहणार

By अजित मांडके | Published: February 12, 2024 05:10 PM2024-02-12T17:10:59+5:302024-02-12T17:12:04+5:30

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून स्टेशन परिसरात गावदेवी मैदानाखाली भुमीगत पार्कींग सेवा सुरु केली आहे.

a parking lot with a capacity of 579 will be constructed in wagle estate area | वागळे इस्टेट भागात ५७९ क्षमता असलेले वाहनतळ उभे राहणार

वागळे इस्टेट भागात ५७९ क्षमता असलेले वाहनतळ उभे राहणार

अजित मांडके, ठाणे : ठाणे महापालिकेच्या माध्यमातून स्टेशन परिसरात गावदेवी मैदानाखाली भुमीगत पार्कींग सेवा सुरु केली आहे. तसेच इतर ठिकाणी देखील पार्कींगची व्यवस्था करण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. त्यात आता एमआयडीसीच्या माध्यमातून वागळे इस्टेट भागात पार्कींग प्लाझा उभारला जात आहे.

 शहरातील सर्वाधिक रहदारी असलेल्या वागळे इस्टेट भागातील नेहरुनगर भुखंडावर एमआयडीसीच्या माध्यमातून तब्बल ५७९ क्षमता असलेले वाहनतळ  उभारले जाणार आहे.यासाठी ३१ कोटी २२ लाख खर्च करून उभारण्यात येणारे हे वाहनतळ दीड वर्षात पूर्ण केले जाणार आहे.

ठाणे शहरात मागील काही वर्षात वाहनांची संख्या ही वाढतांना दिसत आहे. दरवर्षी वाहन वाढीचा दर हा ८ ते १० टक्के एवढा आहे. वाहने वाढत असतांना रस्ते मात्र आजही मोठे झालेले नाहीत, त्यात पालिकेचे पार्कींग धोरण रखडल्याने शहरातील रस्त्यांवर कुठेही कशाही पध्दतीने वाहने पार्क केले जात असल्याचे चित्र आहे. त्यातही स्टेशन परिसरात रेल्वे आणि काही खाजगी पार्कींगमुळे पार्कींगची समस्या काही अंशी सुटू शकलेली आहे. तसेच महापालिकेने देखील याच भागात गावदेवी येथे भुमीगत पार्कींगची व्यवस्था करण्यात आली आहे.

दुसरीकडे आता पार्कींगची ही समस्या लक्षात घेऊन, ठाणे शहरातील भूखंडावर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने पाचमजली वाहनतळ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा शुभारंभ ठाणे येथील वागळे इस्टेट भागातील नेहरूनगर येथे हा भूखंडावर होणार आहे. यासंंबंधीच्या प्रस्तावास महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने २२ आॅगस्ट २०२३ च्या बैठकीत मान्यता दिली. यानंतर महामंडळाने सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडल्यानंतर  नुकतेच येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते  ५७९ वाहन क्षमतेचे बहुमजली वाहनतळ उभारण्याच्या कामाचे भुमीपुजन झाले. त्यानंतर येत्या दिड वर्षात याठिकाणी पार्कींगची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. त्यामुळे वागळे इस्टेट भागातील पार्कींगची समस्या बऱ्याच अंशी मार्गी लागणार आहे.

Web Title: a parking lot with a capacity of 579 will be constructed in wagle estate area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.