ठाणे जिल्ह्यातील भिवंडीच्या कोलीवली गणासाठी ७१ टक्के मतदान; ग्राम पंचायतींच्या १६७ जागांसाठी ६५ टक्के मतदान

By सुरेश लोखंडे | Published: December 26, 2017 08:19 PM2017-12-26T20:19:11+5:302017-12-26T20:20:13+5:30

भिवंडी तालुक्यातील कोलीवली या निर्वाचक गणासाठी मंगळवार सायंकाळपर्यंत ९४० मतदानापैकी ६७० म्हणजे ७१ टक्के मतदान झाले आहे. काही तांत्रिक बिघाडामुळे या भिवंडी पंचायत समितीच्या कोलीवली या गणासाठी फेरमतदान झालें आहे. याशिवाय जिल्ह्यात २५ ग्राम ंपचायतींच्या १६७ जागांसाठी ३.३० वाजेपर्यंत ६५ टक्के मतदान झाले आहे. या गणासह ग्राम पंचायतींसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी २७ डिसेंबर रोजी निश्चित केलेल्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे.

71 percent polling for Koliwali village of Bhiwandi in Thane district; 65 percent polling for 167 seats in Gram Panchayats | ठाणे जिल्ह्यातील भिवंडीच्या कोलीवली गणासाठी ७१ टक्के मतदान; ग्राम पंचायतींच्या १६७ जागांसाठी ६५ टक्के मतदान

ठाणे जिल्ह्यातील भिवंडीच्या कोलीवली गणासाठी ७१ टक्के मतदान; ग्राम पंचायतींच्या १६७ जागांसाठी ६५ टक्के मतदान

Next
ठळक मुद्दे* ३६ जागांसाठी उमेदवारी अर्ज नाही * पहारे ग्रा.पं.साठी उमेदवारीच नाही

ठाणे : जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड व भिवंडी या तीन तालुक्यातील ३१ ग्राम पंचायतींपैकी २५ ग्राम पंचायतींच्या सरपंचांसह १६७ सदस्यांसाठी मंगळवारी मतदान झाले. सुमारे ५० हजार २०८ मतदानापैकी ३.३० वाजेपर्यंत सुमारे ३२ हजार ६०० म्हणजे ६५ टक्के मतदान झाले आहेत. भिवंडीच्या पहारे ग्राम पंचायतींसाठी एकही उमेदवारी अर्ज आलेला नसल्यामुळे तेथे मतदान होऊ शकले नाही.
जिल्ह्यातील ३१ ग्राम पंचायतींपैक २५ ग्राम पंचायतींमध्ये मतदान झाले. उर्वरित पाच ग्राम पंचायतींपैकी काही बिनविरोध तर काही ठिकाणी एकही उमेदवारी अर्ज आलेला नाही. तर पहारे ग्राम पंचायतींत यंदाही उमेदवारी अर्ज न आल्यामुळे मतदान नाही. जिल्ह्यातील सरपंचांसह सदस्यांच्या ३०८ जागांपैकी १०५ जागां बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. तर ३६ जागांसाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. यामुळे उर्वरित १६७ जागांसाठी ३.३० वाजेपर्यंत ६५ टक्के मतदान झाले तर संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत .... म्हणजे ... टक्के मतदान झाले आहे. मतमोजनणी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी २७ डिसेंबर रोजी पार पडणार आहे.

 

Web Title: 71 percent polling for Koliwali village of Bhiwandi in Thane district; 65 percent polling for 167 seats in Gram Panchayats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.