ठाण्यात ४०० सोसायट्यांची कचराकोंडी होण्याची शक्यता  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 06:59 AM2017-11-28T06:59:20+5:302017-11-28T06:59:29+5:30

ज्या सोसायटी, हॉटेल, मॉल, रुग्णालय आदींसह इतर आस्थापनांचा दिवसाचा कचरा हा १०० किलोग्रॅमपेक्षा जास्त निर्माण होत असेल, तो न उचलण्याचा निर्णय ठाणे महापालिकेच्या घनकचरा विभागाने घेतला आहे.

 Than 400 societies likely to be garbage | ठाण्यात ४०० सोसायट्यांची कचराकोंडी होण्याची शक्यता  

ठाण्यात ४०० सोसायट्यांची कचराकोंडी होण्याची शक्यता  

Next

ठाणे : ज्या सोसायटी, हॉटेल, मॉल, रुग्णालय आदींसह इतर आस्थापनांचा दिवसाचा कचरा हा १०० किलोग्रॅमपेक्षा जास्त निर्माण होत असेल, तो न उचलण्याचा निर्णय ठाणे महापालिकेच्या घनकचरा विभागाने घेतला आहे. या आस्थापनांनी ओला आणि सुका कचरा वेगळा करून त्याच ठिकाणी त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावावी, असे केंद्राने काढलेल्या नव्या अध्यादेशात स्पष्ट केले आहे. त्यानुसार, पालिकेने आता ही पावले उचलली आहेत. याचाच एक भाग म्हणून पालिकेने आतापर्यंत शहरातील सुमारे ४०० सोसायट्या, मॉल, हॉटेल, रुग्णालयांना नोटिसा बजावल्या असून त्यांना १५ डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे.
ठाणे महापालिका हद्दीत आजघडीला सुमारे ७०० मेट्रीक टन कचºयाची निर्मिती होत आहे. परंतु, पालिकेला अद्यापही हक्काचे डम्पिग मिळू शकलेले नाही. केवळ ठाणे महापालिकेचीच ही बोंब नसून देशातील इतर महापालिकांतही तीच अवस्था असल्याने यावर काहीतरी उपाय करण्यात यावेत, यासाठी एका व्यक्तीने दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला आहे. त्यानुसार, केंद्र सरकारने यासंदर्भात मागील वर्षी एक अध्यादेश काढून ज्या सोसायटी अथवा आस्थापनांकडून प्रतिदिन १०० किलोग्रॅमपेक्षा जास्त कचºयाची निर्मिती होते. तसेच ज्या सोसायट्या ५ हजार स्केवअर मीटरच्या क्षेत्रात वसल्या आहेत, त्यांनी आपल्या कचºयाचे वर्गीकरण करून त्याच ठिकाणी त्याची विल्हेवाट लावावी, असे स्पष्ट केले आहे.
त्यानुसार ठाणे पालिकेने १५ दिवसांपासून शहरातील अशा आस्थापनांचा सर्व्हे करण्यास सुरुवात केली. या प्रभाग समितीमधील ४०० हून अधिक सोसायट्या, हॉटेल, मॉल, रुग्णालयांना नोटिसा बजावल्याची माहिती घनकचरा विभागाने दिली आहे. विविध प्रभाग समित्यांमधील थेट हिरानंदानी, रूस्तमजी, वृंदावन, श्रीरंग, आकाशगंगा, लोढा, दोस्ती, दौलतनगर, प्रेमनगर, नातू परांजपे, हावरे सिटी, श्रीजी व्हिला, राजदीप सोसायटी, सरोवर दर्शन, सह्याद्री, रघुकुल, वास्तुआनंद, ओझोन व्हॅली, संघवी हिल्स, अमृतांगण, ऋतू पार्क, रुणवाल गार्डन, आदींसह शहरातील इतर महत्त्वाच्या सोसायट्यांना आतापर्यंत नोटिसा बजावल्याचे घनकचरा विभागाने स्पष्ट केले आहे.

यांच्यासह टिपटॉप, प्रशांत कॉर्नर, उत्सव हॉटेल या मोठ्या हॉटेल्ससह इतर महत्त्वाच्या हॉटेलवाल्यांना बॅन्केट हॉल, मोठमोठी रुग्णालये, आयटी पार्कसह वाणिज्य आस्थापनांनादेखील नोटिसा बजावल्या आहेत.

मालमत्ताकरात
पाच टक्के सवलत
या सर्वांना १५ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली असून ओला आणि सुका कचरा वेगळा करून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे सूचित केले आहे. जे अशा पद्धतीने कचºयाची विल्हेवाट लावतील, त्यांना मालमत्ताकरात पाच टक्के सवलत देण्यात येणार आहे. यामुळे निर्मितीच्या ठिकाणी ३० टक्के म्हणजेच २०० मेट्रीक टन कचºयावर प्रक्रिया करण्याचा पालिकेचा भार हलका होईल.

सर्वाधिक १३४ आस्थापना माजिवडा-मानपाड्यात
माजिवडा-मानपाडा प्रभागात १३४ आस्थापना असून यात सोसायट्यांची संख्या सर्वाधिक आहे. येथे २८ हॉटेल, २ आयटी पार्क, २४ हॉस्पिटल आदींचा समावेश आहे. तसेच उथळसर- २१, नौपाडा आणि कोपरी- ४७, कळवा- २३, लोकमान्य- सावरकरनगर- ५५, वर्तकनगर ६१ आदी आस्थापनांना पालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. वागळे, मुंब्रा आणि दिव्यात सध्या सर्व्हे सुरू आहे. सर्व्हे सुरू असतानाच त्या बजावण्याचे काम सुरू आहे.

Web Title:  Than 400 societies likely to be garbage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे