जिल्हा रुग्णालयात १० हजार ६६३ यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया

By अजित मांडके | Published: March 22, 2024 05:04 PM2024-03-22T17:04:14+5:302024-03-22T17:06:08+5:30

मोतीबिंदूच्या बाबतीत अनेकजण दुर्लक्ष करताना दिसतात. काहींना मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा खर्च परवडत नाही तर काही व्यक्ती आज करू उद्या करू म्हणून टाळाटाळ करतात. मात्र याचा विपरीत परिणाम डोळ्यांवर होण्याची शक्यता अधिक असते.

10 thousand 663 successful cataract surgeries in district hospital | जिल्हा रुग्णालयात १० हजार ६६३ यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया

जिल्हा रुग्णालयात १० हजार ६६३ यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया

ठाणे : डोळ्यांतील मोतीबिंदूकडे दुर्लक्ष केल्यावर अंधत्वचा येण्याचा धोका लक्षात घेता,  राष्ट्रीय नेत्र ज्योती अभियानात  विशेष मोतीबिंदू शस्त्रक्रिया पंधरवडा मोहीम कार्यक्रमात ठाणे जिल्ह्यात सिव्हील हॉस्पिटल, खाजगी रुग्णालय , वैद्यकीय महाविद्यालय आणि सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून १० हजार ६६३ यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया पार पडल्या असून, जिल्ह्याला दिलेल्या १० हजार लक्ष्या पेक्षा अधिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून राज्यात ठाणे जिल्ह्याचे कौतुक होत आहे.

 मोतीबिंदूच्या बाबतीत अनेकजण दुर्लक्ष करताना दिसतात. काहींना मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा खर्च परवडत नाही तर काही व्यक्ती आज करू उद्या करू म्हणून टाळाटाळ करतात. मात्र याचा विपरीत परिणाम डोळ्यांवर होण्याची शक्यता अधिक असते. महाराष्ट्र मोतीबिंदू बॅकलॉग मुक्त करण्याच्या दृष्टीने सरकार कडून प्रयत्न केले जात आहेत. ठाणे जिल्ह्यात  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार आणि अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ. धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय नेत्र ज्योती अभियानात मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र पंधरवडा कार्यक्रम सरकारी खाजगी रुग्णालय आणि सेवा भावी संस्थांनी मिळून राबवला. यामध्ये १० हजार ६६३ मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या असल्याची माहिती जिल्हा नेत्र शल्य चिकीत्सक डॉ. प्रसन्नकुमार देशमुख यांनी दिली.

राज्यात सर्वत्र १९ फेब्रुवारी ते ४ मार्च या कालावधीत विशेष मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबवले गेले. ठाणे जिल्ह्यात या अभियानात १० हजाराचे लक्ष दिले होते. परंतु लक्षा  पेक्षा अधिक शस्त्रक्रिया ठाणे जिल्ह्यात पार पडल्या आहेत. ठाणे सिव्हील रुग्णालयातील नेत्र विभागात मोतीबिंदू सोबत डोळ्यांच्या इतर शस्त्रक्रिया देखील मोफत केल्या जात असतात. नेत्र चिकित्सा करण्यासाठी अद्यावत मशीन असून, खाजगी रुग्णालयात होणाऱ्या महागड्या शस्त्रक्रिया मोफत केल्या जात असल्याचे नेत्र सर्जन डॉ. शुभांगी अंबाडेकर म्हणाल्या.

राज्यभरात ह्या मोहिमेत १ लक्ष्य मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे उद्गिष्ट होते एक लाख ८ हजार ९३७ एवढ्या मोटोबिंदू शत्रक्रिया पार पडल्या. मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र या अभियानात ठाणे जिल्ह्यात  झालेल्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया कामगिरीचे शासन स्तरावर कौतुक होत आहे. डोळ्यांचा मोतीबिंदू  रोखायचा झाल्यास नियमित डोळ्यांची तपासणी करावी. धूम्रपान सोडणे, निरोगी आहार घेणे, अँटिऑक्सिडंट्स फळे आणि भाज्या खाव्यात, प्रखर उन्हात यूव्ही ब्लॉकिंग सनग्लासेस घालणे गरजेचे आहे.
डॉ. कैलास पवार (जिल्हा शल्य चिकित्सक,  ठाणे)

Web Title: 10 thousand 663 successful cataract surgeries in district hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.