ऑस्ट्रेलियन ओपन : दुखापतीमुळे झुंजार नादालने सामना अर्ध्यावर सोडला, मरीन चिलिच उपांत्यफेरीत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2018 06:11 PM2018-01-23T18:11:36+5:302018-01-23T18:20:22+5:30

दुखापतीमुळे अव्वल टेनिसपटू राफेल नादालचे ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.

Rafael Nadal retires in fifth set as Marin Cilic | ऑस्ट्रेलियन ओपन : दुखापतीमुळे झुंजार नादालने सामना अर्ध्यावर सोडला, मरीन चिलिच उपांत्यफेरीत

ऑस्ट्रेलियन ओपन : दुखापतीमुळे झुंजार नादालने सामना अर्ध्यावर सोडला, मरीन चिलिच उपांत्यफेरीत

Next
ठळक मुद्देपाचव्या सेटमध्ये 2-0 ने पिछाडीवर पडल्यानंतर नादालने माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला. नादाल आणि चिलिचमधला सामना पाचव्या सेटपर्यंत रंगला होता.

मेलबर्न - दुखापतीमुळे अव्वल टेनिसपटू राफेल नादालचे  ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. कधीही सामना न सोडता शेवटपर्यंत विजयासाठी प्रयत्न करण्यासाठी नादाल ओळखला जातो. पण पायाला झालेल्या दुखापतीमुळे राफेल नादालला अर्ध्यावर सामना सोडावा लागला. राफेलने सामना सोडल्यामुळे मरीन चिलिच उपांत्यफेरीतील प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला. 

पाचव्या सेटमध्ये 2-0 ने पिछाडीवर पडल्यानंतर नादालने माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला. दुखापतीसह खेळणे नदालसाठी अवघड बनले होते. स्पर्धेत सहावे मानांकन मिळालेल्या चिलिचला अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी ब्रिटॉन इडमुंडचा पराभव करावा लागेल. 

नादाल आणि चिलिचमधला सामना पाचव्या सेटपर्यंत रंगला होता. नादालने पहिला सेट 6-3 ने जिंकल्यानंतर दुसरा सेट चिलिच जिंकला. त्यानंतर नादाल आणि चिलिचने सरस खेळाचे प्रदर्शन केले पण दुखापतीमुळे नादालला सामना सोडावा लागला.                                              

Web Title: Rafael Nadal retires in fifth set as Marin Cilic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.