फेडररची गोजोविकवर मात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 03:38 AM2018-08-16T03:38:27+5:302018-08-16T03:38:44+5:30

दिग्गज रॉजर फेडरर याने अमेरिकन ओपनची तयारी करताना एटीपी सिनसिनाटी मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या सलामीला सहज विजयाची नोंद केली.

Federer's goose-win over | फेडररची गोजोविकवर मात

फेडररची गोजोविकवर मात

Next

सिनसिनाटी : दिग्गज रॉजर फेडरर याने अमेरिकन ओपनची तयारी करताना एटीपी सिनसिनाटी मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या सलामीला सहज विजयाची नोंद केली. दुसरीकडे आठवी मानांकित पेट्रा क्वीतोवाने दुसऱ्या फेरीच्या सामन्यात बलाढ्य सेरेना विलियम्सला ६-३,२-६,६-३ ने पराभूत करीत बाहेरचा रस्ता दाखविला.
२०१५ नंतर पहिल्यांदा या स्पर्धेत सहभागी झालेल्या फेडररने जर्मनीच्या ४७ वा मानांकित पीटर गोजोविक याच्यावर सरळ सेटमध्ये ७२ मिनिटांत ६-४, ६-४ ने मात केली. मागच्या आठवड्यात ४७ वर्षांचा झालेल्या २० वेळेचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन फेडररने दुखापतीमुळे मागील दोन स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला नव्हता. आठवा मानांकित आॅस्ट्रियाचा डोमेनिक थिएम हा आजारी असल्याने कोर्टवर आलाच नाही. निक किर्गियोस याने मॅच पॉर्इंट वाचवीत ३९ एसच्या मदतीने दुसºया फेरीच्या सामन्यात डेनिस कुडला याच्यावर ६-७, ७-५,७-६ ने विजय नोंदविला.

सेरेनाचा अनपेक्षित पराभव....

सेरेनाचा पराभव अनपेक्षित ठरला. चुरशीचा झालेल्या या सामन्यात पहिल्या सेट गमावल्यानंतर सेरेना पिछाडीवर पडली. मात्र, यानंतर तिने जबरदस्त पुनरागमन करत आपल्या लौकिकानुसार मोठ्या फरकाने दुसरा सेट जिंकत सामना निर्णायक तिसºया सेटमध्ये नेला.
मात्र यावेळी क्वीतोवाने शानदार नियंत्रण राखताना सेरेनाला चुका करण्यास भाग पाडले आणि चमकदार विजय मिळवताना स्पर्धेतील खळबळजनक निकाल नोंदवला.

Web Title: Federer's goose-win over

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.