लॉन्च होण्याआधीच Xiaomi Redmi Note 5A चे फीचर्स लीक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2017 06:42 PM2017-08-15T18:42:53+5:302017-08-15T19:28:50+5:30

शिओमी रेडमी नोट 5 A (Xiaomi Redmi Note 5A) स्मार्टफोन भारतात लॉन्च होण्याआधीच या स्मार्टफोनचे फीचर्स आणि किंमत लीक झाली आहे. 

Xiaomi Redmi Note 5A's Features Leak Before Launch | लॉन्च होण्याआधीच Xiaomi Redmi Note 5A चे फीचर्स लीक

लॉन्च होण्याआधीच Xiaomi Redmi Note 5A चे फीचर्स लीक

Next
ठळक मुद्देलॉन्च होण्याआधीच या स्मार्टफोनचे फीचर्स आणि किंमत लीक21 ऑगस्टला लॉन्च होणार असल्याची चर्चा5.5 इंचाचा फूल एचडी डिसप्ले 2GB रॅम, 16 जीबी इंटरनल स्टोरेज मेमरी

नवी दिल्ली, दि. 15 - शिओमी रेडमी नोट 5 A (Xiaomi Redmi Note 5A) स्मार्टफोन भारतात लॉन्च होण्याआधीच या स्मार्टफोनचे फीचर्स आणि किंमत लीक झाली आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार,  शिओमीचा Redmi Note 5A हा फोन मोबाईल मार्केटमध्ये 21 ऑगस्ट रोजी लॉन्च करण्यात येणार असल्याची चर्चा होती. मात्र, याआधीच Redmi Note 5A स्मार्टफोनचे फीचर्स आणि त्याची किंमत लीक झाली आहे.  या स्मार्टफोनचे फीचर्स आणि किंमत ऑनलाइन लीक झाली आहे. ऑनलाइन दिलेल्या माहितीनुसार, या स्मार्टफोनची किंमत जवळपास दहा हजार रुपयापर्यंत आहे. 
तसेच, अद्यावत फीचर्स देण्यात आले आहे. यामध्ये 5.5 इंचाचा फूल एचडी डिसप्ले आणि रिझोल्यूशन 1280X720  एवढे आहे. याचबरोबर 2GB रॅम, 16 जीबी इंटरनल स्टोरेज मेमरी देण्यात आली आहे. 13 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा या स्मार्टफोनमध्ये असणार आहे. तर, या स्मार्टफोनमध्ये 3,080 mAHची बॅटरी असल्याचेही सांगण्यात आले आहेत. 
दरम्यान, याआधी लॉन्च करण्यात आलेल्या शिओमी रेडमी नोट 5 चे सुद्धा फीचर्स ऑनलाइन लीक करण्यात आले होते. 

काय आहेत लीक झालेले फीचर्स?
- 5.5 इंचाचा फूल एचडी डिसप्ले 
-  2GB रॅम
- 16 जीबी इंटरनल स्टोरेज मेमरी 
- ऑपरेटिंग सिस्टिम Android 7.1.1 Nougat 
-13 मेगापिक्सल रियर कॅमेरा 
- 5 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा 
-  3,080 mAHची बॅटरी 
 

Web Title: Xiaomi Redmi Note 5A's Features Leak Before Launch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.