Redmi Note 11 4G: Redmi च्या स्वस्त आणि मस्त फोनच्या लाँचसाठी उरले फक्त काही दिवस; खिशाला परवडेल किंमत  

By सिद्धेश जाधव | Published: December 20, 2021 07:45 PM2021-12-20T19:45:02+5:302021-12-20T19:48:40+5:30

Redmi Note 11 4G: चीनमध्ये सादर झालेल्या रेडमी नोट 11 4G चा ग्लोबल व्हेरिएंट आता समोर येऊ लागला आहे. त्यामुळे लवकरच हा फोन भारतासह जगभरात सादर केला जाईल, हे निश्चित झालं आहे.

Xiaomi Redmi Note 11 4G Global Model Specs price leaked certified on IMDA and EEC  | Redmi Note 11 4G: Redmi च्या स्वस्त आणि मस्त फोनच्या लाँचसाठी उरले फक्त काही दिवस; खिशाला परवडेल किंमत  

Redmi Note 11 4G: Redmi च्या स्वस्त आणि मस्त फोनच्या लाँचसाठी उरले फक्त काही दिवस; खिशाला परवडेल किंमत  

Next

Redmi नं आपली Note 11 सीरिज भारतात सादर केली आहे. परंतु कंपनीचे चाहते या सीरिजमधील Redmi Note 11 4G Phone ची आतुरतेने वाट बघत आहेत. कंपनीनं जरी या फोनची अधिकृत माहिती दिली नसली तरी लीक्स आणि रिपोर्ट्समधून हा फोन समोर येत असतो. आता हा आगामी रेडमी फोन IMDA आणि EEC दोन सर्टिफिकेशन्स साईटवर दिसला आहे.  

याआधी आलेला चीनमध्ये सादर झालेल्या रेडमी नोट 11 4G चा ग्लोबल व्हेरिएंट आता समोर येऊ लागला आहे. त्यामुळे लवकरच हा फोन भारतासह जगभरात सादर केला जाईल, हे निश्चित झालं आहे.  

Redmi Note 11 4G चे स्पेसिफिकेशन्स    

Redmi Note 11 4G मध्ये 6.5-इंचाचा डिस्प्ले मिळतो. हा एलसीडी डिस्प्ले फुलएचडी+ रिजोल्यूशन, 90हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. या फोनला मीडियाटेक Snapdragon 680 चिपसेटची प्रोसेसिंग पॉवर देण्यात येईल. 6GB पर्यंत RAM आणि 128GB स्टोरेजसह येणारा रेडमी फोन अँड्रॉइड 11 ओएस आधारित मीयुआय 12.5 वर चालतो.     

फोनमधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये एलईडी फ्लॅश, 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स मिळते. Redmi Note 11 4G मधील फ्रंट कॅमेरा 8 मेगापिक्सलचा आहे. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह या ड्युअल सिम फोनमध्ये 3.5एमएम जॅक, आयआर ब्लास्टर आणि साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. या डिवाइसमधील 5,000एमएएचची बॅटरी 18वॉट फास्ट चार्जिंग आणि 9वॉट रिवर्स चार्जिंगला सपोर्ट करते.     

हे देखील वाचा: 

बजेट कमी आहे? मग 15 हजारांच्या आत येणारे हे धमाकेदार फोन्स एकदा बघाच

सावधान! Google वरील ‘या’ चुकांमुळे तुम्हाला होऊ शकतो तुरुंगवास

Web Title: Xiaomi Redmi Note 11 4G Global Model Specs price leaked certified on IMDA and EEC 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.