WhatsApp नं दिली आनंदाची बातमी! आता चार मोबाईलमध्ये चालणार एक अकाउंट, सुरू कसं करायचं?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 11:05 AM2023-04-26T11:05:10+5:302023-04-26T11:08:41+5:30

WhatsApp ने आपल्या वापरकर्त्यांसाठी नवे फिचर लाँच केलं आहे.

whatsapp update how to use same whatsapp account on up to 4 phones | WhatsApp नं दिली आनंदाची बातमी! आता चार मोबाईलमध्ये चालणार एक अकाउंट, सुरू कसं करायचं?

WhatsApp नं दिली आनंदाची बातमी! आता चार मोबाईलमध्ये चालणार एक अकाउंट, सुरू कसं करायचं?

googlenewsNext

WhatsApp जगभरात प्रसिद्ध असणारे मेसेजिंग अॅप. आता आपल्या वापरकर्त्यांसाठी व्हॉट्स अॅपने मोठी अपडेट दिली आहे. आता तुमच एकच अकाउंट चार मोबाईलवरती चालणार आहे. WhatsApp ने मल्टीपल डिव्हाईस सपोर्ट लाँच केलं आङेत. यामुळे आता वापरकर्त्यांना एकच अकाउंट चार फोनमध्ये वापरता येणार आहे. 

याअगोदर एकच अकाउंट एक फोनमध्ये आणि वेब व्हॉट्सअपद्वारे पीसीवरती वापरता येत होते, आता चार फोनमध्ये एकच अकाउंट वापरता येणार आहे. मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी हे फिचर लाँच करण्याची घोषणा केली आहे.

जबरदस्त! Whatsapp वापरकर्त्यांसाठी मोठी अपडेट, App'मध्ये नवीन Facebook बटण, असं वापरता येणार

"आजपासून तुम्ही एकच WhatsApp अकाउंट चार फोनमध्ये वापरु शकता," असं काल मार्क झुकेरबर्ग यांनी सांगितलं आहे. व्हॉट्सअॅपचे नवीन फीचर काही आठवड्यांत सर्व यूजर्सपर्यंत पोहोचेल. व्हॉट्सअॅपच्या या फीचरची अनेक दिवसांपासून यूजर्स वाट पाहत होते. काही दिवसांपूर्वी हे फीचर व्हॉट्सअॅप बीटा यूजर्ससाठी सुरू करण्यात आले होते. 

नवीन अपडेटच्या मदतीने, वापरकर्ते त्यांचे मेसेज आणि चॅट सर्व डिव्हाइसेसवर सिंक करण्यास सक्षम असतील. व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांना त्यांच्या खात्यात प्रवेश करण्यासाठी नेहमीच डिव्हाइस सोबत ठेवण्याची आवश्यकता नाही. WhatsApp चे हे फीचर एंड-टू-एंड एन्क्रिप्शनसह आले आहे. 

म्हणजेच अनेक डिव्हाईमध्ये तुम्ही WhatsApp चे अकाउंट वापरु शकता. केपनी या फिचरला २०२१ पासूनच WhatsApp Beta वर टेस्ट करत आहे. काही दिवसापूर्वीच कंपनीने या फिचरला सर्व बीट वापरकर्त्यांसाठी सुरू केलं होतं. 

हे फीचर वापरण्यासाठी, तुम्ही अगोदर दोन फोनमध्ये WhatsApp सुरू करणे आवश्यक आहे. व्हॉट्सअॅप उघडल्यावर, तुम्हाला वर दाखवलेल्या हॅम्बर्गर मेनूवर क्लिक करावे लागेल. येथे तुम्हाला Link to Existing Account चा पर्याय मिळेल.  

त्यावर क्लिक केल्यावर तुमच्या समोर QR Code येईल. आता तुम्हाला तुमच्या फोनमध्ये व्हॉट्सअॅप उघडावे लागेल आणि लिंक डिव्हाइसेसच्या पर्यायावर जावे लागेल.

आता तुम्हाला पहिल्या फोनवरून दुसऱ्या फोनवर दाखवलेला QR कोड स्कॅन करावा लागेल. अशाप्रकारे, तुम्ही दोन्ही स्मार्टफोनवर समान WhatsApp खाते वापरू शकता.

Web Title: whatsapp update how to use same whatsapp account on up to 4 phones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.