आता तुमचे WhatsApp दुसरे कोणीही पाहू शकणार नाही, नवीन फीचर लाँच

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 10:05 AM2019-02-07T10:05:42+5:302019-02-07T10:12:51+5:30

व्हॉट्स अ‍ॅपने नुकतेच iOS युजर्ससाठी बायोमेट्रिक ऑथेन्टिकेशन फीचर लाँच केले आहे. गेल्या काही दिवसांपासून या स्क्रीन लॉक फीचरचे टेस्टिंग सुरू होते.

WhatsApp for iOS adds Screen Lock feature | आता तुमचे WhatsApp दुसरे कोणीही पाहू शकणार नाही, नवीन फीचर लाँच

आता तुमचे WhatsApp दुसरे कोणीही पाहू शकणार नाही, नवीन फीचर लाँच

Next
ठळक मुद्देWhatsAppकडून नवीन फीचर लाँचWhatsAppने स्क्रीन लॉक फीचर केलं लाँच

व्हॉट्स अ‍ॅपने नुकतेच iOS युजर्ससाठी बायोमेट्रिक ऑथेन्टिकेशन फीचर लाँच केले आहे. गेल्या काही दिवसांपासून या स्क्रीन लॉक फीचरचे टेस्टिंग सुरू होते. जाणून घेऊया हे नवंकोरं फीचर कसं अ‍ॅक्टिव्हेट करायचं आणि कसं वापरायचं?
दरम्यान, नोटिफिकेशन्स मिळाल्यानंतरही व्हॉट्स अ‍ॅप मेसेज लॉक असतानाही तुम्ही वाचू शकता आणि अनलॉक न करता तुम्हाला मेसेजचा रिप्लाय देणेही शक्य आहे.  

- अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरमध्ये जाऊन WhatsApp सर्च करा
- जर तुमच्या फोनमध्ये व्हॉट्स अ‍ॅपचे जुने वर्जन असेल तर, तुम्हाला अपडेटचा पर्याय दिसेल
- अपडेटवर क्लिक केल्यानंतर काही युजर्संना iTunes च्या पासवर्डची मागणी केली जाऊ शकते. येथे आवश्यक असलेली माहिती भरावी.  
- WhatsAppअपडेट करुन घ्या.  
- WhatsApp ओपन करावे आणि सेटिंग्स ऑप्शनमध्ये जावे.
- अकाऊंट सेटिंग्समध्ये तुम्हाला Privacy ऑप्शन मिळेल.
- Privacy ऑप्शन सिलेक्ट करा, त्यामध्ये सर्वात शेवटी Screen Lockचा ऑप्शन दिसेल.
- स्क्रीन लॉक ओपन केल्यानंतर आणखी काही ऑप्शन दिसतील. 
-  Immediately, After 1 minute आणि 1 Hour, असे ऑप्शन तुम्हाला मिळतील. 
- येथे आपण फेस आयडी किंवा टच आयडी सिलेक्ट करू शकता. 

- फेस आयडीमध्ये फेस स्कॅन होईल, तर टच आयडीमध्ये फिंगरप्रिंट स्कॅन करुन घ्यायचा. 
- येथे तुम्ही टाइम सेट करू शकता. म्हणजे जर प्रत्येक वेळेस तुम्हाला अ‍ॅप लॉक ठेवायचा असेल तर Immediately पर्याय सिलेक्ट करावा किंवा एक मिनिट अथवा एक तासाची वेळ सिलेक्ट करावी. 
हे ऑप्शन्स फोलो केल्यानंतर तुमचे व्हॉट्स अ‍ॅपमध्ये लॉक फीचर झाले आहे. व्हॉट्स अ‍ॅपमध्ये लॉक ऑप्शन नसल्याची तक्रार यापूर्वी अनेक युजर्सकडून करण्यात आली होती. अँड्रॉईडमध्येही लॉकचे फीचर नाहीय, अँड्रॉईडसाठी लॉकचे अनेक अ‍ॅप उपलब्ध आहेत. म्हणूनच कदाचित व्हॉट्स अ‍ॅने सुरुवातीस हे ऑप्शन आयफोन युजर्ससाठी उपलब्ध करुन दिले आहे. 

Web Title: WhatsApp for iOS adds Screen Lock feature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.