मृत्यूनंतरही FB अकाउंट सुरू राहणार, वारसा हक्क देता येणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 03:11 PM2019-03-12T15:11:14+5:302019-03-12T15:14:34+5:30

कोणतीही व्यक्ती कधीही एखाद्या दुर्घटनेशी शिकार होऊ शकते. अशात तुम्ही कधी याचा विचार केलाय का की, तुमच्यानंतर तुमच्या फेसबुक अकाऊंटची काय होतं?

What happens to a Facebook account after the death of a person? | मृत्यूनंतरही FB अकाउंट सुरू राहणार, वारसा हक्क देता येणार!

मृत्यूनंतरही FB अकाउंट सुरू राहणार, वारसा हक्क देता येणार!

Next

कोणतीही व्यक्ती कधीही एखाद्या दुर्घटनेशी शिकार होऊ शकते. अशात तुम्ही कधी याचा विचार केलाय का की, तुमच्यानंतर तुमच्या फेसबुक अकाउंटची काय होतं? हे अकाऊंट असंच पडून राहणार का? तुम्ही कधी विचार केलाय का की, तुमच्या जवळची एखादी व्यक्ती तुम्ही गमावली, तर त्या व्यक्तीच्या फेसबुक अकाउंटचं तुम्ही काय करू शकता? 

वारसदार निवडता येतो

म्हणजे बघा ना आपण मरण्याआधी आपली संपत्ती कुणाला मिळावी यासाठी एक मृत्यूपत्र लिहित असतो. तसंच हे आहे. फेसबुकवर आपल्या अकाउंटची देखरेख करण्यासाठी तुम्ही एक वासरदार निवडू शकता. म्हणजे तुम्हाला 'लिगेसी कॉन्टॅक्ट' ठेवण्याचा पर्याय मिळतो. तुम्ही ठरवलेला लिगेसी कॉन्टॅक्ट तुमच्या मृत्यूनंतर तुमचं अकाउंट मॅनेज करू शकतो. ही व्यक्ती तुमचं प्रोफाइल फोटो बदलू शकते, तुमच्या टाइमलाइनवर पोस्ट 'पिन' करू शकतो आणि फ्रेन्ड रिक्वेस्टला उत्तरे देऊ शकतो. पण या व्यक्तीला तुमच्या फेसबुक काही पोस्ट करण्याची किंवा मेसेजे पाहण्याची परवानगी नसेल. 

मृत व्यक्तींच्या फेसबुक अकाऊंटचं काय होतं?

फेसबुक मृत लोकांच्या अकाउंटला 'मेमोरियलाइज' करतं. म्हणजे त्यांचं अकाउंट डिलीट होत नाही. उलट हे अकाऊंट मृत व्यक्तीच्या आठवणीत तसंच ठेवलं जातं. त्यांच्या पोस्ट आणि फोटो साठवून ठेवल्या जातात. 

मेमोरियलाइज्ड अकाउंटमध्ये व्यक्तीच्या नावाच्या पुढे 'Remembering' असं जोडलं जातं. म्हणजे त्यांना आठवलं जातं. जर मृत व्यक्तीने त्याची टाइमलाइन लोकांच्या पोस्टसाठी खुली ठेवली असेल तर लोक त्यांच्या टाइमलाइनवर पोस्ट करू शकतात.  

मेमोरिअलाइज्ड अकाउंटमध्ये 'पीपल यू मे नो' म्हणजेच फ्रेन्ड सजेशन दिसत नाहीत. तसेच फ्रेन्ड लिस्टमध्ये असलेल्या लोकांना त्यांच्या वाढदिवसाचं नोटीफिकेशन जातं.

जर मृत व्यक्तीने असं पेज तयार केलं असेल ज्याचे ते एकटेच अॅडमिन आहेत. तेव्हा मृत्यूची बातमी मिळताच पेड डिलीट केलं जातं. 
जर मृत व्यक्तीने कुणी लिगेसी कॉन्टॅक्ट ठरवला असेल तर अकाउंटमध्ये बदल करू शकतो. 

जर अकाउंट डिलीट मृत्यूनंतर डिलीट करायचं असेल तर?

लिगेसी कॉन्टॅक्ट असलेल्या पर्यायात जाऊन 'रिक्वेस्ट अकाउंट डिलीशन' सिलेक्ट करा.

फेसबुक एखाद्याच्या मृत्यूची माहिती कशी देणार?

जेव्हा तुम्ही लिगेसी कॉन्टॅक्ट असलेल्या पेजवर असता तेव्ह पेजच्या शेवटी फेसबुक तुम्हाला विचारतं की, तुम्हाला कुणाच्या मृत्यूची माहिती फेसबुक द्यायची आहे का? त्यावर क्लिक करून तुमच्यासमोर एका फॉर्म उघडला जातो. हा फॉर्म अकाउंटच्या मालकाला मृत घोषित करण्यासाठी भरावा लागतो. 

पण तुम्ही असं कुणालाही मृत घोषित करू शकत नाहीत. मरणाऱ्या व्यक्तीचं डेथ सर्टिफिकेट म्हणजेच मृत्यूचा दाखला अपलोड करावा लागतो. हे सर्टिफिकेट व्हेरिफाय केल्यानंतरच फेसबुक त्या व्यक्तीला मृत घोषित करतं. 

एक चांगली बाब

तुमच्या मृत्यूनंतरही फेसबुक तुमचे कोणत्याही प्रकारचे मेसेज कुणासोबत शेअर करणार नाही. इतकेच नाही तर तुमचे लॉग इन डिटेल्सही कुणाला देणार नाही. फेसबुकच्या प्रायव्हसी पॉलिसीनुसार हा गुन्हा आहे. 

आमची तर हीच इच्छा आहे की, तुम्हाला काहीही होऊ नये. तुम्ही एकदम सुरक्षित रहावे. मात्र सोबतच सावधही रहा आणि इतरांनाही त्यांच्यासोबत काही होऊ नये म्हणून सावध करा. जेणेकरून तुमच्या फेसबुकचा कुणी गैरवापर करू नये.

Web Title: What happens to a Facebook account after the death of a person?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.