विवो वाय71आय : फुल व्ह्यू डिस्प्ले आणि अन्य उत्तमोत्तम फीचर्स

By शेखर पाटील | Published: July 18, 2018 10:15 AM2018-07-18T10:15:31+5:302018-07-18T10:16:12+5:30

विवो कंपनीने वाय७१आय हा फुल व्ह्यू डिस्प्लेयुक्त स्मार्टफोन बाजारपेठेत उतारण्याची तयारी केली असून यात अन्य उत्तमोत्तम फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे. 

VivoWay 71I: Full View Display and other great features | विवो वाय71आय : फुल व्ह्यू डिस्प्ले आणि अन्य उत्तमोत्तम फीचर्स

विवो वाय71आय : फुल व्ह्यू डिस्प्ले आणि अन्य उत्तमोत्तम फीचर्स

Next

विवो कंपनीने वाय७१आय हा फुल व्ह्यू डिस्प्लेयुक्त स्मार्टफोन बाजारपेठेत उतारण्याची तयारी केली असून यात अन्य उत्तमोत्तम फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे. विवो वाय७१आय हे मॉडेल अधिकृतपणे बाजारपेठेत उतारण्यात आलेले नसले तरी याच्या मूल्यासह सर्व फीचर्सची माहिती लिस्टींगच्या स्वरूपात समोर आली आहे. अलिकडच्या काळात फुल व्ह्यू या प्रकारातील डिस्प्ले लोकप्रिय होत आहेत. यामुळे स्मार्टफोनच्या दोन्ही उभ्या बाजूंच्या कडा आणि वर-खाली स्क्रीन वगळता अन्य भाग कमीत कमी असावा याकडे कंपन्या लक्ष देत आहेत. नेमका हाच प्रयत्न विवो वाय७१आय या मॉडेलमध्येही करण्यात आलेला आहे. यातील डिस्प्ले हा ६ इंच आकारमानाचा आणि एचडी प्लस (१४४० बाय ७२० पिक्सल्स) क्षमतेचा आहे. यातील कडा अतिशय बारीक आहेत.

उर्वरित फीचर्सचा विचार केला असता, विवो वाय७१आय या मॉडेलमध्ये क्वॉलकॉमचा क्वॉड-कोअर स्नॅपड्रॅगन ४२५ हा प्रोसेसर देण्यात आला आहे. याची रॅम २ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते २५६ जीबीपर्यंत वाढविता येणार आहे. एफ/२.० अपर्चर आणि एलईडी फ्लॅशने युक्त असणारा यातील मुख्य कॅमेरा ८ मेगापिक्सल्सचा असेल. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यामध्ये ५ मेगापिक्सल्सचा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. याचे अपर्चर एफ/२.२ असून यामध्ये एआय ब्युटी हे विशेष फिचर देण्यात आले आहे. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी, ओटीजी आदी फिचर्स असतील. तसेच यात फिंगरप्रिंट स्कॅनरसह अ‍ॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत.  

विवो वाय७१आय हे मॉडेल अँड्रॉइडच्या ओरियो ८.१ या प्रणालीवर चालणारे असून यावर विवो कंपनीचा फनटच ओएस ४.० हा युजर इंटरफेस देण्यात आला आहे. यातील बॅटरी ३,३६० मिलीअँपिअर क्षमतेची आहे. या मॉडेलचे मूल्य ८,९९० रूपये असल्याचे लिस्टींगमध्ये नमूद करण्यात आले आहे. हे मॉडेल येत्या काही दिवसांमध्ये अधिकृतपणे बाजारपेठेत उपलब्ध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Web Title: VivoWay 71I: Full View Display and other great features

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.