विवो विंटर कार्निव्हल : Vivo V7+, Vivo V5 Plus स्मार्टफोनवर सूट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2017 08:24 PM2017-11-15T20:24:35+5:302017-11-15T20:28:20+5:30

यामध्ये अनेक विवोच्या स्मार्टफोनवर सवलती देण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये Vivo V7+, Vivo V5s, Vivo V5 Plus, Vivo Y69, Vivo Y66, Vivo Y53 आणि Vivo Y55s या स्मार्टफोनवर सूट देण्यात आली आहे.

Vivo Winter Carnival: Vivo V7 +, Vivo V5 Plus Smartphone Suite | विवो विंटर कार्निव्हल : Vivo V7+, Vivo V5 Plus स्मार्टफोनवर सूट

विवो विंटर कार्निव्हल : Vivo V7+, Vivo V5 Plus स्मार्टफोनवर सूट

Next
ठळक मुद्देविवोच्यावतीने अमेझॉनवर विंटर कार्निव्हल सेलविवोच्या स्मार्टफोनवर सवलती अमेझॉन पे बॅलन्स म्हणून 5 टक्के कॅशबॅक

मुंबई  : चीनची कंपनी असलेल्या विवोने आपल्या ग्राहकांसाठी स्मार्टफोनवर खास ऑफर आणली आहे. विवोच्यावतीने अमेझॉनवर विंटर कार्निव्हल सेलचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये अनेक विवोच्या स्मार्टफोनवर सवलती देण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये Vivo V7+, Vivo V5s, Vivo V5 Plus, Vivo Y69, Vivo Y66, Vivo Y53 आणि Vivo Y55s या स्मार्टफोनवर सूट देण्यात आली आहे. त्यामुळे तुम्हाला जर एखादा विवोचा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल, तर तुम्हाला विवो विंटर कॉर्निव्हलचा नक्कीच फायदा होईल. 
 विवो विंटर कॉर्निव्हल तीन दिवसांचा आहे. म्हणजेच आजपासून (बुधवार)सुरुवात झाली असून शुक्रवारपर्यंत हा चालणार आहे. विवोच्या स्मार्टफोनवर 3 हजार रुपयांपर्यंत एक्स्चेंज ऑफर सुद्धा देण्यात आली आहे. तर अमेझॉन पे बॅलन्स म्हणून 5 टक्के कॅशबॅक मिळणार आहे. याचबरोबर, एक्स्चेंज ऑफरसह फोन खरेदी केल्यास 2 हजार रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल. V7+ सोबत बारा महिन्यांसाठी रिप्लेसमेंट गॅरंटी देण्यात आली आहे.
दरम्यान, कंपनीने काही दिवसांपूर्वीच V7+ नव्या रंगामध्ये लाँच केला होता. या फोनची किंमत 21 हजार 990 रुपये आहे. अमेझॉनवर हा फोन खरेदीसाठी उपलब्ध केला आहे. V5 प्लसची किंमत 19 हजार 990 रुपये आहे. मात्र हा फोन 17 हजार 990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. Y69 14 हजार 990 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. तर Y66 13 हजार 990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. Y53 9 हजार 990 रुपये आणि Y55S 11 हजार 990 रुपयांमध्ये खरेदी करु शकता.
 

Web Title: Vivo Winter Carnival: Vivo V7 +, Vivo V5 Plus Smartphone Suite

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.