मुंबई: मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरने ट्विटमधील अक्षरसंख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ट्विट करण्यासाठी असलेली 140 अक्षरांची मर्यादा वाढवली आहे. अक्षरमर्यादेत दुपटीने वाढ करण्यात आली आहे. ट्विटरवर आधी 140 अक्षरांची मर्यादा होती. मात्र आता ती दुप्पट म्हणजेच 280 अक्षरांची करण्यात आली आहे. त्यामुळे आता ट्विट करताना तुम्हाला अक्षर मर्यादेचा जास्त विचार करायची आवश्यकता राहणार नाही. पण चायनिज, जापनिज आणि कोरियन भाषेत ट्वीट करणाऱ्यांना मात्र आधीचीच अक्षरमर्यादा असेल. याचा फायदा मराठी भाषेत ट्वीट करण्यांनाही होणार आहे. कारण मराठी भाषेत ट्वीट करताना काना, मात्रा, उकार मोजले जातात. त्यामुळे अक्षर मर्यादा लवकर संपत होती. पण आता अक्षर मर्यादा वाढवण्यात आल्यामुळे ट्वीट एडिट करत बसण्यात वेळ जाणार नाही. 
जपानी, कोरियाई किंवा चीनी भाषेत एका कॅरेक्टरमध्ये दुप्पट माहिती देता येते पण इंग्रजी भाषेत हे शक्य नाही. अनेक जणांना 140 कॅरेक्टरमध्ये व्यक्त होता येत नसल्याने ते लोकं ट्विटच करत नाहीत. कॅरेक्टर लिमिट वाढल्याने ट्विट न करणारे लोकंही ट्विट करतील असा विश्वास ट्विटरकडून व्यक्त करण्यात आला आहे.  
यापूर्वी सप्टेंबर महिन्यात कॅरेक्टर लिमिट वाढवण्यात येणार असल्याची माहिती ट्विटरने दिली होती.  'तुमचे टि्वट 140 कॅरॅक्टरमध्ये बसत नाहीत का? आम्ही काहीतरी नवं करण्याचा प्रय़त्न करत आहोत ही मर्यादा आता 280 होणार आहे.' असं ट्विटरकडून सांगण्यात आलं होतं. त्यानंतर काही निवडक युझर्ससाठी कॅरेक्टर लिमिट 280 करण्यात आलं होतं. पण आता चाचणी यशस्वी झाल्यामुळे ट्विटरने कॅरेक्टर लिमिट 280 केल्याची अधिकृत घोषणा केली आहे. 
  


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.