दणदणीत फिचर्सनी सज्ज असुस झेनफोन एआर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 12:02 PM2017-07-25T12:02:56+5:302017-07-25T16:35:20+5:30

असुस कंपनीने भारतात तब्बल आठ जीबी रॅम आणि प्रोजेक्ट टँगो व डे ड्रीमचा सपोर्ट असणारा आपला झेनफोन एआर हा फ्लॅगशीप स्मार्टफोन आज भारतीय बाजारपेेठेत लाँच केला आहे.

Sounding Ficci's Ready Asus Zenfone AR | दणदणीत फिचर्सनी सज्ज असुस झेनफोन एआर

दणदणीत फिचर्सनी सज्ज असुस झेनफोन एआर

Next

असुस कंपनीने भारतात तब्बल आठ जीबी रॅम आणि प्रोजेक्ट टँगो व डे ड्रीमचा सपोर्ट असणारा आपला झेनफोन एआर हा फ्लॅगशीप स्मार्टफोन आज भारतीय बाजारपेेठेत लाँच केला आहे.
आसुस झेनफोन एआर या मॉडेलमध्ये प्रथमच विस्तारीत सत्यता म्हणजेच ऑग्युमेंटेड रिअ‍ॅलिटी (एआर) आणि व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी (व्हिआर) अर्थात आभासी सत्यता या दोन्ही प्रकारांचा सपोर्ट प्रदान करण्यात आला आहे. म्हणजेच गुगलच्या टँगो आणि डे ड्रीम या दोन्ही प्रकारांना याचा सपोर्ट असून या प्रकारचा हा पहिलाच स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ८२१ प्रोसेसर प्रदान करण्यात आला आहे. याची रॅम आठ जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज १२८ जीबी इतके असेल. यात ५.७ इंच आकारमानाचा आणि क्युएचडी म्हणजेच २५६० बाय १४०० पिक्सल्स क्षमतेचा सुपर अमोलेड डिस्प्ले असेल. हे मॉडेल अँड्रॉईडच्या ७.० नोगट प्रणालीवर चालणारे असून यात ३००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.  
असुस झेनफोन एआर या स्मार्टफोनमध्ये मुख्य कॅमेरा २३ मेगापिक्सल्स क्षमतेचा आहे. यात अतिशय उच्च दर्जाचे सोनी आयएमएक्स ३१७ हे सेन्सर आहे. याशिवाय यात ट्रायटेक प्लस ऑटो-फोकस सिस्टीम, ड्युअल पीडीएएफ, आणि कंटिन्युअस फोकस आदींसह तीन अंशीय ऑप्टीकल इमेज स्टॅबिलायझेशन व तीन अंशीय इलेक्ट्रॉनिक इमेज स्टॅबिलायझेशन आदी फिचर्स प्रदान करण्यात आले आहेत. या कॅमेर्‍याच्या मदतीने फोर-के क्षमतेचे व्हिडीओ चित्रीकरण शक्य आहे. याशिवाय यात मागील बाजूसच फिशआय लेन्सयुक्त ८ मेगापिक्सल्स क्षमतेचा कॅमेरा आहे. हे मॉडेल ग्राहकांना ४९,९९९ रूपये मुल्यात फ्लिपकार्टवरून खरेदी करता येणार आहे.

Web Title: Sounding Ficci's Ready Asus Zenfone AR

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.