2021 मधील सर्वोत्कृष्ट स्मार्टफोन पुरस्कार सॅमसंगला; जाणून घ्या विजेत्या स्मार्टफोनची वैशिष्टये 

By सिद्धेश जाधव | Published: July 3, 2021 04:35 PM2021-07-03T16:35:02+5:302021-07-03T16:36:09+5:30

MWC GLOMO Awards 2021: मोबाईल वर्ल्ड काँग्रेसने (MWC) 2021 मधील सर्वोत्कृष्ट स्मार्टफोन म्हणून Samsung Galaxy S21 Ultra ची निवड केली आहे.  

Samsung Galaxy S21 Ultra bags award for best phone at mwc 2021  | 2021 मधील सर्वोत्कृष्ट स्मार्टफोन पुरस्कार सॅमसंगला; जाणून घ्या विजेत्या स्मार्टफोनची वैशिष्टये 

2021 मधील सर्वोत्कृष्ट स्मार्टफोन पुरस्कार सॅमसंगला; जाणून घ्या विजेत्या स्मार्टफोनची वैशिष्टये 

Next

मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2021 मध्ये ग्लोबल मोबाईल अवॉर्ड्स (GLOMO Awards) 2021 चे वितरण करण्यात आले. या पुरस्करांमधील बेस्ट स्मार्टफोनचा पुरस्कार Samsung Galaxy S21 Ultra ने पटकवला आहे. हा पुरस्कार दरवर्षी जगभरातील मोबाईल इंडस्ट्रीमध्ये नावीन्य आणणाऱ्या हार्डवेयर, सॉफ्टवेयर आणि सर्व्हिसेसची दखल घेऊन देण्यात येतो. 30 जून रोजी झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात Samsung Galaxy S21 Ultra 5G ची निवड गेल्यावर्षी लाँच झालेल्या स्मार्टफोनपैकी ‘Best Smartphone’ म्हणून करण्यात आली. विशेष म्हणजे हा स्मार्टफोन जानेवारीमध्ये लाँच झाला आहे.  

Galaxy S21 Ultra सोबत Apple iPhone 12 Pro Max, OnePlus 9 Pro, Samsung Galaxy S20 FE 5G आणि Xiaomi Mi 11 Ultra या स्मार्टफोन्सना बेस्ट स्मार्टफोनसाठी नामांकन मिळाले होते. हा पुरस्कार स्मार्टफोनचे हार्डवेयर, सॉफ्टवेयर, डिजाईन, वापर किंमत, व्यवसायिक यश, पर्यावरणावरील परिणाम, अपडेट्स इत्यादी अनेक पैलूंचा विचार करून देण्यात येतो.  

Samsung Galaxy S21 Ultra चे स्पेसिफिकेशन  

Samsung Galaxy S21 Ultra स्मार्टफोनमध्ये 3200 x 1440 पिक्सल रिजोल्यूशनसह 6.8 इंचाचा क्वाडएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. अँड्रॉइड 11 वर चालणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये सॅमसंगचा एक्सनाॅस 2100 चिपसेट देण्यात आला आहे. हा चिपसेट 5 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनला आहे आणि डुअल मोड 5जीला सपोर्ट करतो. 

Samsung Galaxy S21 Ultra च्या मागे क्वाॅड रियर कॅमेरा सेटअप मिळतो. या सेटअपमध्ये फ्लॅश लाईटसह 108 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर मिळतो. त्याचबरोबर फोनमध्ये 12 मेगापिक्सलची डुअल पिक्सल अल्ट्रा वाइड लेन्स, 10 मेगापिक्सलची टेलीफोटो लेन्स आणि 10 मेगापिक्सलची सेकंडरी टेलीफोटो लेन्स आहे. सॅमसंग गॅलेक्सी एस21 अल्ट्राचा कॅमेरा सेग्मेंट 100X स्पेस जूम, 10X आणि 3X ऑप्टिकल झूमला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ काॅलिंगसाठी Galaxy S21 Ultra मध्ये 40 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.  

सॅमसंगचा हा फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएचच्या मोठी बॅटरी 25वाॅट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह देण्यात आली आहे. सॅमसंगने या फोनचा 12 जीबी रॅम व 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंट भारतात 1,05,999 रुपयांमध्ये लॉन्च केला होता. 

Web Title: Samsung Galaxy S21 Ultra bags award for best phone at mwc 2021 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.