सॅमसंग गॅलेक्सी जे ४ (२०१८) ऑफलाईन बाजारपेठेत दाखल

By शेखर पाटील | Published: May 31, 2018 11:23 AM2018-05-31T11:23:22+5:302018-05-31T11:23:22+5:30

सॅमसंग कंपनीने आपला गॅलेक्सी जे ४ (२०१८) हा स्मार्टफोन ऑफलाईन पध्दतीत भारतीय बाजारपेठेत सादर केला असून हे मिड-रेंजमधील मॉडेल आहे.

Samsung Galaxy J4 (2018) filed in the offline market | सॅमसंग गॅलेक्सी जे ४ (२०१८) ऑफलाईन बाजारपेठेत दाखल

सॅमसंग गॅलेक्सी जे ४ (२०१८) ऑफलाईन बाजारपेठेत दाखल

googlenewsNext

सॅमसंग कंपनीने आपला गॅलेक्सी जे ४ (२०१८) हा स्मार्टफोन ऑफलाईन पध्दतीत भारतीय बाजारपेठेत सादर केला असून हे मिड-रेंजमधील मॉडेल आहे. काही दिवसांपूर्वीच सॅमसंगच्या गॅलेक्सी जे ४ (२०१८) या मॉडेलची कंपनीच्या संकेतस्थळावर लिस्टींग करण्यात आली होती. यामुळे हा स्मार्टफोन लवकरच भारतात दाखल होणार असल्याचे संकेत मिळाले होते. या अनुषंगाने कंपनीने कोणताही गाजावाजा न करता आपला हा स्मार्टफोन देशभरातील शॉपीजमधून ९,९९९ रूपये मूल्यात उपलब्ध केला आहे. तर सध्या तरी कोणत्याही शॉपींग पोर्टलवर याला उपलब्ध करण्यात आलेले नाही.

सॅमसंग गॅलेक्सी जे ४ (२०१८) या मॉडेलमध्ये ५.५ इंच आकारमानाचा आणि एचडी क्षमतेचा (१२८० बाय ७२० पिक्सल्स) सुपर अमोलेड डिस्प्ले देण्यात आलेला आहे. यामध्ये एक्झीनॉस ७५७० प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम २ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविता येणार आहे. याच्या मागील बाजूस एलईडी फ्लॅशयुक्त १३ मेगापिक्सल क्षमतेचा कॅमेरा देण्यात आलेला आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यामध्ये ५ मेगापिक्सल्सचा कॅमेरा दिलेला आहे. यामध्ये ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या ८ अर्थात ओरियो आवृत्तीवर चालणारा असेल.

Web Title: Samsung Galaxy J4 (2018) filed in the offline market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :samsungसॅमसंग