Reliance Jio Customers will get 10 GB of data free | रिलायन्स जिओकडून ग्राहकांना भन्नाट गिफ्ट, 10 जीबी डाटा फ्री 
रिलायन्स जिओकडून ग्राहकांना भन्नाट गिफ्ट, 10 जीबी डाटा फ्री 

मुंबई - मोबाइल इंटरनेट इंडस्ट्रीत धुमाकूळ घालणा-या रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांना एक भेट दिली आहे. जिओ टीव्हीवर लाइव्ह स्ट्रिमिंगसाठी जिओकडून युजर्सना 10जीबी मोफत 4G डाटा दिला जात आहे. यामुळे जिओ ग्राहक आता प्रतीदिन मिळणा-या इंटरनेट डाटा खर्चाची चिंता न करता लाइव्ह टीव्ही पाहू शकणार आहेत. रिलायन्स जिओ कोणताही अतिरिक्त भार न लावत ही सुविधा देत आहे. 

रिलायन्स जिओला 2018 चा प्रतिष्ठित ग्लोबल मोबाइल  (GLOMO) पुरस्कार मिळाला आहे. बर्सिलोना येथे आयोजित मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये मिळालेल्या पुरस्काराचा आनंद ग्राहकांसोबत शेअर करत जिओने 10 जीबी डाटा फ्री देण्याची घोषणा केली आहे. पण ही ऑफर फक्त प्राइम मेम्बर्ससाठी आहे. 

जिओने मेसेज आणि अॅप नोटिफिकेशनच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. मेसेजमध्ये लिहिण्यात आलं आहे की, 'जिओ टीव्हीने मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये बेस्ट मोबाइल व्हिडीओ कंटेंटचा प्रतिष्ठित ग्लोबल मोबाइल अवॉर्ड्स 2018 जिंकला आहे.. आम्हाला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही दिलेल्या सहकार्याबद्दल आम्ही तुमच्या अकाऊंटवर 10 जीबी कॉम्प्लिमेंट्री डाटा अॅड करत आहोत'.

तुम्हाला 10 जीबी डाटा मिळाला आहे की नाही, हे तुम्ही रिलायन्स जिओ अॅपच्या MY Plans वर जाऊन चेक करु शकता. हा डाटा ऑटोमेटेड असल्या कारणाने काही युजर्सच्या अकाऊंटमध्ये आधीच जमा झाला आहे, पण जर तुम्हाला मिळाला नसेल तर तुम्ही 1299 वर मिस कॉल देऊन तो मिळवू शकता. हा डाटा काही ठराविक कालावधीपुरता मर्यादित आहे. 


Web Title: Reliance Jio Customers will get 10 GB of data free
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.