लाखो मोबाईल ग्राहकांना मोठा धक्का!  Reliance Jio-Airtel पुन्हा टॅरिफ वाढविणार? जाणून घ्या सविस्तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2022 08:46 PM2022-12-24T20:46:39+5:302022-12-24T20:47:08+5:30

Reliance Jio Airtel Tariffs Price : देशातील दोन सर्वात मोठ्या टेलिकॉम ऑपरेटर रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल आपल्या रिचार्ज प्लॅनमध्ये 10 टक्के वाढ करण्याची शक्यता आहे.

Reliance Jio Airtel Tariffs Price To Increase 10 Percent Recharge Plan Might Costlier | लाखो मोबाईल ग्राहकांना मोठा धक्का!  Reliance Jio-Airtel पुन्हा टॅरिफ वाढविणार? जाणून घ्या सविस्तर...

लाखो मोबाईल ग्राहकांना मोठा धक्का!  Reliance Jio-Airtel पुन्हा टॅरिफ वाढविणार? जाणून घ्या सविस्तर...

googlenewsNext

नवी दिल्ली : टेलिकॉम कंपन्या आपल्या टॅरिफच्या किंमतीत 10 टक्क्यांपर्यंत वाढ करू शकतात. याचाच अर्थ मोबाईल फोन वापरणाऱ्या ग्राहकांच्या खिशावरचा बोजा पुन्हा एकदा वाढणार आहे. देशातील दोन सर्वात मोठ्या टेलिकॉम ऑपरेटर रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल आपल्या रिचार्ज प्लॅनमध्ये 10 टक्के वाढ करण्याची शक्यता आहे.

Business Insider च्या एका रिपोर्टमध्ये टेलिकॉम कंपन्यांकडून देशात टॅरिफ महाग करण्यासंदर्भात खुलासा झाला आहे. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, "मागील टॅरिफ वाढीनंतर मिळालेले सर्व फायदे जवळजवळ संपले आहेत आणि त्यावर रेव्हेन्यू आणि नफा वाढवण्यासाठी सतत दबाव आहे. त्यामुळे टेलिकॉम कंपन्यांना पुन्हा एकदा टॅरिफमध्ये वाढ करण्याची गरज निर्माण झाली आहे."

टॅरिफ महाग होण्याचे कारणही या रिपोर्टमध्ये उघड करण्यात आले आहे. रेव्हेन्यूवरील सततचा दबाव, मध्यम नफा आणि ARPU रेटमधील मार्जिन हे या अपेक्षित टॅरिफवाढीचे एक कारण असू शकते. रिपोर्टनुसार, रिलायन्स जिओचा ARPU रेट 0.8 टक्क्यांनी वाढला आहे आणि एअरटेल आणि व्होडाफोनचा ARPU रेट 1 टक्क्यांनी वाढला आहे.

या रिपोर्टमध्ये असेही नमूद करण्यात आले आहे की, एअरटेलने काही टेलिकॉम सर्कलमध्ये 99 रुपयांचा प्रीपेड प्लॅन बंद करून टॅरिफ वाढीची चाचणी सुरू केली आहे. या प्लॅनमध्ये कंपनी 2.5 पैसे प्रति मिनिट दराने कॉल आणि 200MB डेटा देते. यानंतर, हा प्लॅन 57 टक्के खर्चाने पुन्हा सुरू करण्यात आली. आता या प्लॅनमध्ये 155 रुपयांमध्ये अनलिमिटेड कॉल आणि 1 जीबी डेटा दिला जात आहे.

दरम्यान, अलीकडेच केंद्रीय मंत्री देवसिंह चौहान म्हणाले होते की, सध्या टेलिकॉम ऑपरेटर देशातील आपल्या ग्राहकांना 5G सेवा देण्यासाठी दर आठवड्याला सरासरी 2500 बेस स्टेशन इन्स्टॉल करत आहेत. 26 नोव्हेंबरपर्यंत देशात 20,980 मोबाईल बेस स्टेशन बसवण्यात आल्याचे मंत्र्यांनी राज्यसभेत सांगितले होते. यापैकी रिलायन्स जिओ आणि एअरटेलने अनुक्रमे 17,687 आणि 3,293 बेस स्टेशन इन्स्टॉल केले आहेत. व्होडाफोन-आयडिया देखील आपल्या प्रतिस्पर्ध्यांनंतर टॅरिफची किंमत वाढवू शकते.

Web Title: Reliance Jio Airtel Tariffs Price To Increase 10 Percent Recharge Plan Might Costlier

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.