खुशखबर! रिलायन्स डिजिटलच्या 'जिओ एचपी स्मार्ट सिम लॅपटॉप'वर १०० जीबी डेटा मिळणार मोफत  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 04:30 PM2022-07-16T16:30:36+5:302022-07-16T16:32:09+5:30

जिओ एचपी स्मार्ट सिम लॅपटॉप या डिव्हाइसची ऑफर खूप चर्चेचा विषय बनली आहे.

Reliance Digital's 'Jio HP Smart SIM Laptop' will get 100GB data free | खुशखबर! रिलायन्स डिजिटलच्या 'जिओ एचपी स्मार्ट सिम लॅपटॉप'वर १०० जीबी डेटा मिळणार मोफत  

खुशखबर! रिलायन्स डिजिटलच्या 'जिओ एचपी स्मार्ट सिम लॅपटॉप'वर १०० जीबी डेटा मिळणार मोफत  

googlenewsNext

 नवी दिल्ली - जिओ एचपी स्मार्ट सिम लॅपटॉप (Jio HP Smart Sim Laptop) या डिव्हाइसची ऑफर खूप चर्चेचा विषय बनली आहे. कारण या ऑफरच्या माध्यमातून ग्राहकांना कोणतेही शुल्क न मोजता १०० जीबी डेटा मोफत मिळणार आहे, हे पहिलेच एक स्मार्ट LTE लॅपटॉप आहे. लक्षणीय बाब म्हणजे ही ऑफर निवडक HP लॅपटॉपच्या नवीन ग्राहकांसाठी फक्त लागू आहे. यामुळे ग्राहकांना नवीन HP LTE लॅपटॉपसह नवीन Jio सिमची सदस्यता घेतल्यावर १०० जीबी डेटा ३६५ दिवसांसाठी १५०० रूपयांच्या रिचार्जमध्ये मोफत मिळेल. 

दरम्यान, हे HP लॅपटॉप मॉडेल HP 14ef1003tu आणि HP 14ef1002tu जिओ एचपी स्मार्ट सिम लॅपटॉप ऑफर रिलायन्स डिजिटल स्टोअर्समधून खरेदी केलेल्या एचपी स्मार्ट लॅपटॉपवर खरेदी केले जाऊ शकते. तर RelianceDigital.in किंवा JioMart.com याद्वारे ऑनलाइन देखील खरेदी केले जाऊ शकते. विशेष म्हणजे ही पहिलीच अशी ऑफर आहे ज्याच्या माध्यमातून ग्राहकांना १०० जीबी डेटा फ्रीमध्ये मिळणार आहे. 

१०० जीबी डेटा मिळणार मोफत
तसेच या डिव्हाइसच्या खरेदीवर ग्राहकांना १५०० रूपयांच्या किमतीमध्ये १०० जीबी मोफत डेटासह कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारता नवीन जिओ सिमकार्ड मिळणार आहे. तुमच्या १०० जीबीचा डेटा संपल्यानंतर राहिलेल्या वैध कालावधीसाठी इंटरनेटचा वेग ६४ Kbps असा असेल. याशिवाय युजर्स अतिरिक्त हाय स्पीड 4G डेटासाठी MyJio किंवा Jio.com वरून उपलब्ध डेटा पॅकसह रिचार्ज करून हाय स्पीड इंटरनेटचा आनंद घेऊ शकतात. जर तुम्हाला कागदपत्रे देऊन याचा लाभ घ्यायचा असेल तर ते देखील शक्य आहे. यासाठी तुम्ही ते ऑनलाइन reliancedigital.in आणि JioMart.com वर आणि ऑफलाइन रिलायन्स डिजिटल स्टोअरवर आवश्यक कागदपत्रे देऊन मिळवू शकता.

Web Title: Reliance Digital's 'Jio HP Smart SIM Laptop' will get 100GB data free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.