PUBG Mobile Season 4: लवकरच होणार लाँच, जाणून घ्या खास फीचर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 10:30 AM2018-11-21T10:30:27+5:302018-11-21T10:30:42+5:30

लहानग्यांमध्ये अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या Player Unknown's Battlegrounds (PUBG) या गेमच्या शौकिनांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे.

pubg mobile season 4 upgraded version launching date features | PUBG Mobile Season 4: लवकरच होणार लाँच, जाणून घ्या खास फीचर्स

PUBG Mobile Season 4: लवकरच होणार लाँच, जाणून घ्या खास फीचर्स

googlenewsNext

PUBG Mobile Season 4: लहानग्यांमध्ये अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या Player Unknown's Battlegrounds (PUBG) या गेमच्या शौकिनांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे. या प्रसिद्ध गेमचा चौथा सीझन लवकरच येणार आहे. कंपनीनं PUBGच्या अपडेट वर्जनची माहिती स्वतःच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे. त्यानंतर PUBG गेम खेळणाऱ्या मुलांचाही उत्साह दुणावला आहे. या गेमचा तिसरा सीझन जो Battle Royale Game नावानं प्रसिद्ध आहे, तो गेल्या 18 नोव्हेंबरला संपला आहे. अशातच लवकरच या गेमचा चौथा सीझन येण्याची लहान मुलं वाट पाहत आहेत.   

केव्हा येणार चौथा सिझन- PUBGचा नवा सिझन 20 नोव्हेंबरला युजर्सच्या भेटीला येणार आहे. 21 नोव्हेंबर रोजी PUBGचं नव वर्जन ग्लोबल सर्व्हरशी कनेक्ट केलं जाणार असून, त्यानंतर युजर्सना तो गेम खेळता येणार आहे. चौथ्या सिझनमधील PUBG गेम खेळताना जुन्या युजर्सलाही नव्यानं सुरुवात करावी लागणार आहे. त्यामुळे हा गेम खेळण्यासाठी तुम्हाला चौथा सिझन नव्यानं सुरू करावा लागणार आहे. तसेच मॅपच्या दर्जातही कंपनीनं सुधारणा केली आहे. 

नव्या गेमचं नाव रॉयल पास- PUBG गेमचा हा चौथा सीझन रॉयल पास नावानं ओळखला जाणार आहे. या सीझनमध्ये युजर्सला प्रत्येक आठवड्याला नवं आव्हान मिळणार आहे. तसेच युजर्स 100RP लेव्हलपर्यंत हा गेम खेळू शकणार आहेत. या सीझनमध्ये दोन पर्याय उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यात पहिल्या पर्यायाला इलिट अपग्रेट, दुसरा पर्याय इलिट अपग्रेट प्लस असं नाव देण्यात आलं आहे. दोन्ही कॅटेगरीमध्ये युजर्सला वेगवेगळे फायदे मिळणार आहेत. जसं की 100 यूसी खर्च करण्याचा फायदा मिळणार आहे.

ज्यात तुम्ही 100 क्रॉस केल्यानंतर स्पेशल रिवॉर्ड मिळणार आहे. ज्यात पुढील स्टेज अनलॉक करण्याची परवानगी मिळणार आहे. या नवा सीझन फारच रोमांचक असल्याची चर्चा आहे. नव्या सीझनमध्ये युजर्स असॉल्ट रायफल M762चा एक्सेस, नवी शस्त्रास्त्र, पॅराशूटचा वापर, एअरोप्लेन आणि व्हेईकल्स आदी मिळणार आहे. त्याच बरोबर स्कूटर आणि खराब हवामानातही तुम्हाला चांगल्या मॅपची सुविधा मिळणार आहे. लवकरच मोबाईलवर हा गेम खेळता येणार आहे. परंतु अनेक लहान मुलं या गेमच्या आहारी गेली असून, हिंसक कृत्यासाठीही प्रवृत्त होत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हा गेमच्या आहारी जाणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे. 

Web Title: pubg mobile season 4 upgraded version launching date features

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.