आता इनबिल्ट प्रोजेक्टरयुक्त स्मार्टवॉच

By शेखर पाटील | Published: March 5, 2018 12:09 PM2018-03-05T12:09:32+5:302018-03-05T12:09:32+5:30

घरगुती इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या निर्मितीतील आघाडीचे नाव असणार्‍या हायर कंपनीने इनबिल्ट प्रोजेक्टरची सुविधा असणारे असू हे स्मार्टवॉच बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.

Now inbuilt smartwatch with projector | आता इनबिल्ट प्रोजेक्टरयुक्त स्मार्टवॉच

आता इनबिल्ट प्रोजेक्टरयुक्त स्मार्टवॉच

Next

घरगुती इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या निर्मितीतील आघाडीचे नाव असणार्‍या हायर कंपनीने इनबिल्ट प्रोजेक्टरची सुविधा असणारे असू हे स्मार्टवॉच बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. वेअरेबल्स अर्थात परिधान करण्यायोग्य उपकरणांच्या लोकप्रियतेत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यात फिटनेस ट्रॅकरसह स्मार्टवॉचच्या विक्रीतही वाढ होत असल्याचे निदर्शनास आली आहे. तर येत्या कालखंडात स्मार्टवॉच आणि फिटनेस ट्रॅकरमधील फरकदेखील नष्ट होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. यातच स्मार्टवॉचच्या निर्मितीच्या स्पर्धेत इलेक्ट्रॉनिक होम अप्लायन्सेससह विविध टेक कंपन्या आणि पारंपरिक घड्याळांचे उत्पादकही उतरले आहेत. यामुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन फीचर्स देण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. या अनुषंगाने हायर कंपनीने मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये प्रदर्शित केलेले असू या नावाचे स्मार्टवॉच हे अतिशय अनोख्या फीचरने सज्ज असून यात इनबिल्ट प्रोजेक्टर देण्यात आले आहे.

हायरचे असू हे स्मार्टवॉच युजरच्या मनगटावर याच्या डिस्प्लेवर असणारी माहिती प्रक्षेपित करण्यास सक्षम आहे. अर्थात कुण्या युजरला एसएमएस आल्यास तो विरूद्ध बाजूला असणारे बटण दाबून याला मनगटावर प्रक्षेपित करू शकतो. यामुळे अर्थातच मोठ्या पार्श्‍वभागावर प्रक्षेपण होत असल्यामुळे युजरला डिस्प्लेपेक्षा हा संदेश वा अन्य माहिती सुलभपणे वाचता येते. यातील उर्वरित फीचर्स हे अन्य स्मार्टवॉचनुसाराच असतील. अर्थात याला स्मार्टफोन कनेक्ट करता येणार आहे. याच्या डिस्प्लेवर स्मार्टफोनचे नोटिफिकेशन्स पाहता येतील. सर्वात महत्वाची बाब म्हणजे यात अ‍ॅक्टीव्हिटी ट्रॅकरदेखील आहे. याच्या मदतीने कुणीही युजर आपण चाललेले अंतर, यातून वापरण्यात आलेल्या कॅलरीज, निद्रेची मात्र आदी महत्त्वाची माहिती मिळवू शकतो. याचे मूल्य आणि उपलब्धतेची माहिती कंपनीने दिली नाही. मात्र पहिल्यांदा हे मॉडेल चीनमध्ये सादर करण्यात येणार असून नंतर अन्य बाजारपेठांमध्ये याला उतारण्यात येणार आहे.

Web Title: Now inbuilt smartwatch with projector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.