सॅमसंग गॅलेक्सी एस ९ आणि एस ९ प्लसची नवीन आवृत्ती

By शेखर पाटील | Published: March 30, 2018 10:49 AM2018-03-30T10:49:33+5:302018-03-30T10:49:33+5:30

सॅमसंग कंपनीने आपल्या गॅलेक्सी एस ९ आणि एस ९ प्लस या नुकत्याच सादर केलेल्या फ्लॅगशीप मॉडेलची १२८ जीबी स्टोअरेज असणारी नवीन आवृत्ती भारतीय ग्राहकांना सादर केली आहे.

New version of Samsung Galaxy S9 and S9 Plus | सॅमसंग गॅलेक्सी एस ९ आणि एस ९ प्लसची नवीन आवृत्ती

सॅमसंग गॅलेक्सी एस ९ आणि एस ९ प्लसची नवीन आवृत्ती

Next

भारतीय बाजारपेठेत गॅलेक्सी एस ९ आणि गॅलेक्सी एस ९ प्लस हे दोन स्मार्टफोन्स ६४ जीबी आणि २५६ जीबी इनबिल्ट स्टोअरेजच्या पर्यायांमध्ये सादर करण्यात आले होते. आता या दोन्ही मॉडेल्सची १२८ जीबी रॅम असणारी आवृत्ती ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. यातील गॅलेक्सी एस ९ हे मॉडेल ६१,००० तर एस ९ प्लस हे मॉडेल ६७,००० रूपये मूल्यात ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. 

स्टोअरेज वगळता यातील सर्व अन्य फिचर्स हे आधीच्या आवृत्तीनुसारच असतील. अर्थात सॅमसंग गॅलेक्सी एस९ या मॉडेलमध्ये ५.८ इंच आकारमानाचा आणि क्युएचडी प्लस या क्षमतेचा १८:५:९ अस्पेक्ट रेशो असणारा सुपर अमोलेड डिस्प्ले आहे. याची रॅम ४ जीबी असून यात ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. तर सॅमसंग गॅलेक्सी एस९ प्लस या मॉडेलमध्ये ६.२ इंच आकारमानाचा आणि क्युएचडी प्लस या क्षमतेचा १८:५:९ अस्पेक्ट रेशो असणारा सुपर अमोलेड डिस्प्ले आहे. याची रॅम ६ जीबी असून यात ३,५०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. दोन्हींचे स्टोअरेज ४०० जीबीपर्यंत वाढविता येणार आहे. हे स्मार्टफोन्स वॉटरप्रूफ आणि डस्टप्रूफ आहेत. या दोन्ही मॉडेल्समध्ये मागील बाजूस १२ मेगापिक्सल्सचा ड्युअल पिक्सल या प्रकारातील कॅमेरा आहे. यातील अपार्चर एफ/१.५ या क्षमतेचे आहे. हे अपार्चर डिजीटल पध्दतीने एफ/२.४ पर्यंत वाढविता येते. यात कमी उजेड असल्यास एफ/१.५ अपार्चरने तर विपुल उजेडात एफ/२.४ अपार्चरने छायाचित्रे घेता येतात. या कॅमेर्‍यांच्या अ‍ॅपमध्ये बिक्सबी व्हिजन हे फिचर दिले आहे. याच्या अंतर्गत काढलेल्या प्रतिमांमधील विविध फलक तसेच अन्य शब्दांच्या अनुवादाची सुविधा दिली आहे. तर या दोन्ही मॉडेल्समध्ये ऑटो-फोकस आणि एफ/१.७ अपार्चरयुक्त ८ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Web Title: New version of Samsung Galaxy S9 and S9 Plus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :samsungसॅमसंग