Netflix युजर्ससाठी बॅड न्यूज, लवकरच सबस्क्रिप्शन होणार महाग!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2023 05:20 PM2023-10-04T17:20:04+5:302023-10-04T17:20:43+5:30

नेटफ्लिक्सकडून किंमत वाढवण्याची ही दुसरी वेळ असणार आहे.

Netflix Price Hike Globally Soon Know The Reason | Netflix युजर्ससाठी बॅड न्यूज, लवकरच सबस्क्रिप्शन होणार महाग!

Netflix युजर्ससाठी बॅड न्यूज, लवकरच सबस्क्रिप्शन होणार महाग!

googlenewsNext

नेटफ्लिक्स वापरणे लवकरच महाग होण्याची शक्यता आहे. कारण कंपनी पुन्हा एकदा किंमत वाढवणार आहे. नेटफ्लिक्स जागतिक स्तरावर सबस्क्रिप्शन वाढवण्याची योजना आखत आहे, परंतु त्याची अमेरिका आणि कॅनडापासून होऊ शकते. यानंतर भारतासह इतर बाजारपेठांमध्ये याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. नेटफ्लिक्सकडून किंमत वाढवण्याची ही दुसरी वेळ असणार आहे.

भारतातील नेटफ्लिक्सचे प्लॅन्स

मोबाइल प्लॅन
हा 149 रुपयांचा मंथली प्लॅन आहे, जो एकाच मोबाइल आणि टॅबलेटवर वापरला जाऊ शकतो. यावर, SB 480 pixels वर स्ट्रीमिंग होते.

बेसिक प्लॅन
हा प्लॅन 199 रुपयांचा आहे. या प्लॅनमध्ये सिंगल मोबाइल, टॅबलेट, कॉम्प्युटर आणि स्मार्ट टीव्हीवर स्ट्रीमिंग करता येते. यामध्ये 720 पिक्सलची क्वालिटी मिळते.

स्टँडर्ड प्लॅन
या प्लॅनसाठी तुम्हाला महिन्याभरासाठी 499 रुपये द्यावे लागतील. या प्लॅनमध्ये दोन ठिकाणी स्ट्रीमिंग केले जाते. यामध्ये तुम्हाला 1080 पिक्सेल क्वालिटी मिळेल.

प्रीमियम प्लॅन
या प्लॅनसाठी तुम्हाला दरमहा 649 रुपये द्यावे लागतील. यात 4K आणि HDR व्हिडिओ स्ट्रीमिंगची सुविधा उपलब्ध आहे.

किती वाढ होईल?
वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार, नेटफ्लिक्सचे सबस्क्रिप्शन किती वाढेल याबाबत सध्या कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. नवीन दर कधी लागू होणार याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही.

नेटफ्लिक्स सब्सक्रिप्शन प्लॅन
काही देशांमध्ये नेटफ्लिक्सने सबस्क्रिप्शनच्या किमती कमी केल्या आहेत. या महिन्यात कंपनीने पासवर्ड शेअरिंग फीचर बंद करण्याची घोषणा केली होती. नेटफ्लिक्सने गेल्या वर्षी आपल्या सर्व प्लॅनच्या किमती वाढवल्या होत्या. ॲड फ्री सबस्क्रिप्शन प्लॅन 15.49 डॉलर मध्ये उपलब्ध होता. तर प्रीमियम प्लॅन 19.99 डॉलर प्रति महिना होता. आता पासवर्ड शेअरिंगसाठी दरमहा 7.99 डॉलर असे वेगळे शुल्क आकारले जाईल असेही जाहीर करण्यात आले आहे.

किंमती वाढण्याचे कारण?
हॉलिवूड अभिनेते आणि लेखक प्रदीर्घ काळापासून आंदोलन करत आहेत, त्यामुळे उत्पादन खर्च वाढण्याची अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत नेटफ्लिक्सकडून किमती वाढण्याचे संकेत मिळत आहेत.

Web Title: Netflix Price Hike Globally Soon Know The Reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.