आता घरात कुठेही मिळवा Smart TV ची मजा; चार्जिंग सपोर्टसह आला LG चा भन्नाट टीव्ही 

By सिद्धेश जाधव | Published: December 14, 2021 07:54 PM2021-12-14T19:54:55+5:302021-12-14T19:56:11+5:30

LG StandbyME Smart TV: एलजीनं नव्या Smart TV ची घोषणा केली आहे. हा स्मार्ट टीव्ही एका स्टॅन्डसह बाजारात येईल आणि यातील चार्जिंग फिचरमुळे टीव्हीचा वापर कुठेही करता येईल.

Lg standbyme touchscreen smart tv with battery power set on stand with wheels showcased lg object oled tv with fabric cover  | आता घरात कुठेही मिळवा Smart TV ची मजा; चार्जिंग सपोर्टसह आला LG चा भन्नाट टीव्ही 

आता घरात कुठेही मिळवा Smart TV ची मजा; चार्जिंग सपोर्टसह आला LG चा भन्नाट टीव्ही 

googlenewsNext

अनेकांच्या घरात फक्त एक टीव्ही असतो. हा टीव्ही एकाच खोलीत ठेवला जातो. परंतु जर दुसऱ्या खोलीत देखील काही काळासाठी टीव्ही हवा असेल तर?  किंवा आपण जिथे जाऊ तिथे टीव्ही हवा असेल तर?  टेक्नॉलॉजी ब्रँड LG कडे याचं उत्तर आहे. कंपनीनं नव्या स्मार्ट टीव्हीची घोषणा केली आहे. जो फक्त तुम्हाला हवा तिथे नेता येत नाही तर जिथे विजेचं कनेक्शन नाही तिथे देखील हा टीव्ही वापरता येईल. LG नं या स्मार्ट टीव्हीच नाव StandbyME ठेवलं आहे.  

LG StandbyME Smart TV 

LG नं एक नवीन स्मार्ट टीव्ही StandbyME बनवला आहे, हा स्मार्ट टीव्ही बॅटरीवर चालतो. तसेच या सोबत एक स्टॅन्ड येतो. टीव्ही स्टॅन्डवर सेट करून कुठेही नेता येतो. यातील 27-इंचाची स्क्रीन फक्त हॉरिजॉन्टल नव्हे तर वर्टिकली सेट करता येते. तसेच या टीव्हीची उंची आणि अँगल देखील अ‍ॅडजस्ट करता येतो. म्हणजे तुम्ही बेडवर झोपून किंवा सोफ्यावर बसून देखील हा टीव्ही बघू शकता. तसेच किचनमध्ये काम करत तुमची आवडती सिरीयल बघू शकता.  

हा टीव्ही स्टॅन्डवरून काढून सामान्य टीव्हीप्रमाणे भीतीवर किंवा टेबलवर सेट करता येईल. हा स्मार्ट टीव्ही सिंगल चार्जवर 3 तास वापरता येईल. यात एक टच-स्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच यात Netflix, Amazon Prime Video आणि YouTube सारखे स्ट्रीमिंग अ‍ॅप्स वापरता येतील. कनेक्टव्हिटीसाठी यात NFC, एक USB पोर्ट आणि एक HDMI पोर्ट मिळतो. या भन्नाट टीव्हीची किंमत किती असेल, हे मात्र कंपनीनं सांगितलं नाही. लवकरच हा टीव्ही बाजारात येईल अशी अपेक्षा आहे.  

हे देखील वाचा:  

रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण सांगणारे ‘हे’ आहेत बेस्ट स्मार्टवॉच; आधीच देतील आजारांची सूचना

Smartphone सर्विस सेंटरमध्ये देण्याआधी या 10 गोष्टींची काळजी नाही तर होऊ शकतं मोठं नुकसान

Web Title: Lg standbyme touchscreen smart tv with battery power set on stand with wheels showcased lg object oled tv with fabric cover 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.