कार्बन के 9 स्मार्ट सेल्फी : जाणून घ्या सर्व फिचर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2017 02:50 PM2017-11-03T14:50:32+5:302017-11-03T14:53:10+5:30

कार्बन कंपनीने खास सेल्फी प्रेमींसाठी आपला कार्बन के ९ स्मार्ट सेल्फी हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. कार्बन के ९ स्मार्ट सेल्फी या मॉडेलमधील महत्वाचे फिचर वर नमूद केल्यनुसार सेल्फी कॅमेरा आहे.

Know all the features of karbonn k9 mobile | कार्बन के 9 स्मार्ट सेल्फी : जाणून घ्या सर्व फिचर्स

कार्बन के 9 स्मार्ट सेल्फी : जाणून घ्या सर्व फिचर्स

googlenewsNext

मुंबई - कार्बन कंपनीने खास सेल्फी प्रेमींसाठी आपला कार्बन के ९ स्मार्ट सेल्फी हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. कार्बन के ९ स्मार्ट सेल्फी या मॉडेलमधील महत्वाचे फिचर वर नमूद केल्यनुसार सेल्फी कॅमेरा आहे. या मॉडेलमध्ये ८ मेगापिक्सल्स क्षमतेचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. खरं तर अन्य फ्लॅगशीप मॉडेल्समध्ये यापेक्षा उत्तम दर्जाचे कॅमेरे आहेत. आता तर काही स्मार्टफोनमध्ये ड्युअल फ्रंट कॅमेरेदेखील देण्यात आले आहेत. यामुळे कार्बन के ९ स्मार्ट सेल्फी या मॉडेलमधील ८ मेगापिक्सल्सच्या फ्रंट कॅमेर्‍यात नवीन काय? असा प्रश्‍न कुणीही विचारू शकतो.

तर या कॅमेर्‍यात फेस ब्युटी हे फिचर प्रदान करण्यात आले आहे. याच्या मदतीने अतिशय उत्तम दर्जाच्या सेल्फी प्रतिमा घेता येत असल्याचा कंपनीचा दावा आहे. तर या कॅमेर्‍यात नाईट मोडदेखील प्रदान करण्यात आला आहे. हे फिचरदेखील युजर्सला उपयुक्त ठरणारे आहे. तर यातील मुख्य कॅमेरा एलईडी फ्लॅशसह ५ मेगापिक्सल्सचा असेल. यातही फेस ब्युटी आणि नाईट मोड हे दोन्ही फिचर्स देण्यात आले आहेत. 

कार्बन के ९ स्मार्ट सेल्फी या मॉडेलमध्ये ५ इंच आकारमानाचा आणि एफडब्ल्यूव्हिजीए म्हणजे ८०० बाय ४८० पिक्सल्स क्षमतेचा २.५ डी डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. याची रॅम एक जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ८ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने ३२ जीबीपर्यंत वाढविता येणार आहे. या स्मार्टफोनमध्ये २३०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून ती मायक्रो-युएसबीच्या मदतीने चार्ज करता येणार आहे. तर हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारा असेल.

कार्बन के ९ स्मार्ट सेल्फी या मॉडेलमध्ये फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. मात्र यात फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आलेले नाही. काळा आणि निळा या दोन रंगांच्या पर्यायात कार्बन के ९ स्मार्ट सेल्फी हे मॉडेल ४,८९० रूपये मूल्यात ग्राहकांना ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे.

Web Title: Know all the features of karbonn k9 mobile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.