काय आहे कार्ड क्लोनिंग? जाणून घ्या कसं केलं जातं तुमचं ATM कार्ड हॅक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2018 05:22 PM2018-06-22T17:22:58+5:302018-06-22T17:22:58+5:30

हे कार्ड क्लोनिंग काय असतं? त्या माध्यमातून कसं फसवलं जातं? हे तुम्हाला माहीत आहे का? नसेल तर जाणून घेऊ काय आहे हा नेमका प्रकार.....

know all about this card cloning | काय आहे कार्ड क्लोनिंग? जाणून घ्या कसं केलं जातं तुमचं ATM कार्ड हॅक

काय आहे कार्ड क्लोनिंग? जाणून घ्या कसं केलं जातं तुमचं ATM कार्ड हॅक

Next

कार्ड क्लोन हा शब्द गेल्या काही दिवसांपासून अनेकदा ऐकला असेल. या माध्यामातून डेबिट कार्डचं क्लोन तयार केलं जातं. म्हणजेच तुमच्याच कार्डसारखं एक डुप्लिकेट कार्ड तयार करुन त्याचा वापर केला जातो. कार्ड क्लोनिंगच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. पण हे कार्ड क्लोनिंग काय असतं? त्या माध्यमातून कसं फसवलं जातं? हे तुम्हाला माहीत आहे का? नसेल तर जाणून घेऊ काय आहे हा नेमका प्रकार.....

प्रत्येक डेबिट कार्डमध्ये एक मॅग्नेटिक स्ट्रीप असते. ज्यात अकाऊंटशी निगडीत सगळी माहिती असते. फसवेगिरी करणारे लोक स्कीमर नावाच्या एका डिवाईसचा वापर कार्ड क्लोनिंग करण्यासाठी केला जातो. हे डिवाईस एका कार्ड स्वॅपिंग मशिनमध्ये फिट केलं जातं आणि कार्ड स्वाईप केल्यावर तुमच्या कार्डचे डिटेल्स कॉपी होतात. कॉपी केलेला डेटा एका इंटरनल मेमरी यूनिटमध्ये स्टोर होतो. 

त्यानंतर हा डेटा एका ब्लॅंक कार्डमध्ये कॉपी केला जातो आणि फ्रॉड ट्रान्झॅक्शन या फेक कार्डने केले जातात. एटीएमच्या किपॅडमध्ये जेव्हा एखादा यूजर आपल्या कार्डचा पिन एंटर करतो तेव्हा ओवरले डिवाईसच्या माध्यमातून पिन कोड रिड केला जातो. त्यानंतर हॅकर्स या माहितीच्या आधारे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करुन पैसे लुटतात.

मीडिया रिपोर्टनुसार, स्कीमर 7 हजार रुपयांना खरेदी केलं जाऊ शकतं. अनेक ई-कॉमर्स वेबसाईटवरुनही हे खरेदी केलं जाऊ शकतं. क्लोनिंग करणारे लोक हे बॅंकेचा मोनोग्राम जसाच्या तसा तयार करु शकत नाही. अशात हे लोक स्कीमरमधील कॉपी डेटा प्लेन कार्डमध्ये टाकून सेव्ह करतात. 

या गोष्टींची घ्या काळजी

- एटीएममधून पैसे काढण्याआधी तपासून बघा की, एटीएमवर स्कीमर नाहीये ना!
- स्वॅपिंग पॉईंटच्या आजूबाजूला हात लावून बघा की, काही लावलेलं तर नाहीये. स्कीमरचं डिझाईन एखाद्या मशीनच्या पार्टसारखं असतं. 
- किपॅडचा एक कोपरा दाबून बघा, जर किपॅडवर स्कीमर असेल तर किपॅडचा एका भाग वर उचलला जाईल. 
- वेळोवेळी एटीएमचा पिन बदलने गरजेचे आहे. याने फसवणूक करणाऱ्याचा प्लॅन यशस्वी होणार नाही. 
 

Web Title: know all about this card cloning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.