जिओ फोन 2 घेताय?... 'असे' वाचवा 500 रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2018 01:22 PM2018-11-05T13:22:14+5:302018-11-05T13:42:09+5:30

जिओ फोन 2 घेण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी आता एक खूशखबर आहे. दिवाळीच्या निमित्ताने 5 ते 12 नोव्हेंबर दरम्यान ओपन सेलमध्ये जिओ फोनची विक्री करण्यात येणार आहे.

jio phone 2 festive open sale to be held from today on jio com | जिओ फोन 2 घेताय?... 'असे' वाचवा 500 रुपये

जिओ फोन 2 घेताय?... 'असे' वाचवा 500 रुपये

नवी दिल्ली - जिओ फोन 2 घेण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी आता एक खूशखबर आहे. दिवाळीच्या निमित्ताने 5 ते 12 नोव्हेंबर दरम्यान ओपन सेलमध्ये जिओ फोनची विक्री करण्यात येणार आहे. Jio.Com वर ओपन सेलअंतर्गत जिओचा लेटेस्ट फीचर फोन उपलब्ध असणार आहे. मात्र ग्राहकांनी पेटीएम वॉलेटच्या माध्यमातून खरेदी केल्यास 500 रुपयांचा कॅशबॅक मिळणार आहे.

जिओ फोन 2 हा याआधीही अनेक वेळा फ्लॅश सेलमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होता. या फीचर फोनची विक्री सर्वप्रथम ऑगस्टमध्ये सुरू झाली. रिलायन्स जिओने जिओ फोन-2 हा फोन जिओ वनचं पुढील व्हर्जन असण्याची घोषणा केली होती. यामध्ये पहिल्या जिओ फोनमध्ये नसलेल्या अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. जिओ फोन-2 मध्ये व्हॉट्सअॅप वापरता येतं. रिलायन्स जिओ फोन-2 ची किंमत 2,999 रुपये आहे.

Jio Phone Gift Card: रिलायन्स जिओचा दिवाळी धमाका! जियोफोन गिफ्ट कार्ड लाँच

सणांचा मुहूर्त साधत ग्राहकांसाठी सेलचं आयोजन करण्यात येत असताना आता रिलायन्सजिओनेही ग्राहकांसाठी एक खास ऑफर आणली आहे.  काही दिवसांपूर्वी जिओने एक फेस्टिव्ह गिफ्ट कार्ड आणलं आहे. रिलायन्स जिओफोन गिफ्ट कार्ड असं या कार्डचं नाव असून 1095 रुपये या कार्डची किंमत आहे. रिलायन्स डिजिटल स्टोअर्सबरोबरच अॅमेझॉनच्या वेबसाईटवरही या कार्डची खरेदी करता येणार आहे. रिलायन्स जिओकडून हे गिफ्ट कार्ड मान्सून हंगामा ऑफरअंतर्गत जारी करण्यात आलं आहे. या कार्डद्वारे युजर कोणत्याही ब्रँडच्या जुन्या फोनच्या बदल्यात नवा जिओफोन 501 रुपयात विकत घेऊ शकतो. तसेच या गिफ्ट कार्डसोबत 594 रुपयांचं स्पेशल रिचार्ज देखील मिळणार आहे. या कार्डच्या माध्यमांतून ग्राहकांना अनेक सेवांचा मोफत लाभ घेता येणार आहे.

Web Title: jio phone 2 festive open sale to be held from today on jio com

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.